Homeघडामोडीसरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ता- आजरा यांची वार्षिक आठवा बैठक संपन्न..

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ता- आजरा यांची वार्षिक आठवा बैठक संपन्न..

आजरा (प्रतिनिधी ) – सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र ता- आजरा यांच्या वतीने नुतन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार व वार्षिक आढावा बैठक आज गंगामाई वाचन मंदिर येथील मृत्युंजयकार शिवाजी सावंत सभागृह, आजरा येथे पार पडली . या कार्यक्रमात सुंदर गाव स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाल्याबद्दल वेळवटी गावचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच लाकुडवाडीचे सरपंच शंकर कुराडे व सतेवादी/ देऊलवाडीच्या सरपंच नंदाताई पोतनीस यांचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आजरा तालुक्यातील सर्व आजी, माजी, नूतन सरपंच , उपसरपंच व सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी मा जि प सदस्य व सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र चे जिल्हा संघटक श्री शिवाजी (आप्पा) मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी जल, जंगल व जमीन या ज च्या त्रिसूत्री वर काम करण्याची गरज असल्याचे शिवाजी मोरे म्हणाले. सरपंचांनी संघटित राहणे गरजेचे आहे. विशेषतः महिला सरपंचांनी आपल्या पतीला किंवा मुलांना स्वतःची सही अजिबात शिकवू नये, ग्रामपंचायत तिच्या कागदपत्रांवर स्वतः वाचल्याशिवाय व विषय समजून घेतल्याशिवाय सही करू नये असे प्राध्यापक पी डी पाटील सर म्हणाले. त्यांनी ग्रामविकास या विषयांवर सर्वाना मार्गदर्शन केले. सरपंचांचे मानधन तुटपुंजे आहे ते वाढण्यासाठी व इतर मागण्यांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे मारुती मोरे सर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी सरदेसाई यांनी केले तसेच त्यांनी वार्षिक जमा खर्चाचा आढावा सादर केला. आजरा तालुका सरपंच परिषद , मुंबई महाराष्ट्र चे काम अत्यंत पारदर्शी असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुकाध्यक्ष ऍड गुडुलकर यांनी स्वागत केले व शंकर कुराडे यांनी आभार मानले.
मारुती मोरे सर यांची आजरा अर्बन बँकेच्या संचालक पदी व मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी तर बंडोपंत चव्हाण यांची तालुकाध्यक्ष पदी व रचना होलम यांची मराठा महासंघाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड झाले बद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे राज्य कार्यकारणी सदस्य राजाराम पोतनीस, पश्चिम महाराष्ट्रात कार्याध्यक्ष काशीनाथ तेली, आजरा तालुका कार्याध्यक्ष संतोष बेलवाडे, मार्गदर्शक दीपक देसाई, सहसचिव अमोल बांबरे, सुनील देसाई, पं स सदस्या व माझी सभापती रचना होलम, महिला तालुकाध्यक्ष वृषाली कोंडुस्कर, लता रेडेकर, वैशाली गुरव इ सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन इंजल सर यांनी केले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular