Homeघडामोडीसाप्ताहिक राशिभविष्य - सोमवार दि.११ ऑक्टोबर ते रविवार दि....

साप्ताहिक राशिभविष्य – सोमवार दि.११ ऑक्टोबर ते रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१

🟣साप्ताहिक राशीभविष्य🟣

🔴सोमवार दि.११ अॉक्टोबर ते रविवार दि. १७ अॉक्टोबर २०२१🔴

राशिभविष्य मेष –

आठवड्याच्या सुरुवातीलाच अचानक धन खर्च होण्याची शक्यता आहे.मंगळवार पासून मात्र लाभ होतील. पण गृह कलहाला सामोरे जावे लागेल.त्यामुळे शक्यतो वादविवाद टाळा. उत्तरार्धात आवेशपूर्ण झोकून द्याल कामे मिळतील.मित्रांचे सहकार्य लाभेल.

राशिभविष्य वृषभ

आठवड्याच्या सुरुवतीलाच भाऊबंदकी अनुभवाल.शांत राहून आपले काम करीत रहा.जोडिदार देखील चिडचिड करेल.आपले अंदाज चूकतील.पण अचानक धनलाभ होऊन आप्त शांत होतील.संतती बाबत कोणतेही निर्णय घेणे टाळा. शेवटी तुंम्हालाच झुकते माप मिळणार आहे हे लक्षात ठेवा.

राशिभविष्य मिथुन

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर याची प्रचीती येईल. केलेल्या कामाचे चीज होईल.अचानक धनलाभाचे योग येतील.सासुरवाडी कडूनही लाभ संभवतात. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.आरोग्य सांभाळा.

राशिभविष्य कर्क

आठवड्याच्या सुरुवातीलाच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. यात्रा कराल.घरात काही तरी धार्मिक कृत्य कराल.या सर्व धामधुमीत आठवड्याच्या शेवटी खीसा रिकामा होईल.तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका.

राशिभविष्य सिंह –

सध्या अतिशय शांत आणि सावधपणे काम करणे आवश्यक आहे. विनाकारण खर्च करु नका. आवक मंदावण्याची शक्यता आहे.तरिही आपणांस भाग्याची उत्तम साथ मिळेल.मनात आखलेल्या योजना पूर्णत्वाला जातील.

राशिभविष्य कन्या

या आठवड्यात मुलांच्या अभ्यासाकडे आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका.वाहन चालवताना काळजी घ्या.आठवड्याच्या शेवटी उत्तम लाभ होतील.कौटुंबिक सहलीला जाल.

http://linkmarathi.com/मला-मांजर-ओसीडी-का-लागली/

राशिभविष्य तुळ

या आठवड्यात प्रकृती स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.वेळीच वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्या. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.नवीन जागा,वास्तू खरेदी-विक्री यात मग्न रहाल.शेवटी लाभ होतील.मातेला दुःख अगर त्रास होणार नाही याची दक्षता घ्या.

राशिभविष्य वृश्चिक

संतती कडून लाभ होण्याची शक्यता आहे. किंवा संतती बाबत चांगली बातमी कानी येईल.जूनी येणी वसूल होतील.मित्रमंडळी सहकार्य करतील. हाती घेतलेली कामे रेंगाळण्याची शक्यता आहे,लक्ष द्या.कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्या. जोडीदाराची साथ उत्तम राहील.शैक्षणिक प्रगती उत्तम होईल.

राशिभविष्य धनु

कौटुंबिक धनाचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या,तसेच धन सुरक्षित ठेवा. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष धद्या. मातेची प्रकृती सांभाळा. मित्र तसेच नातेवाईक मंडळींच्या गाठीभेटी होतील. मन प्रसन्न राहील.

राशिभविष्य मकर

अचानक अंगावर पडलेली जबाबदारी सहज पेलून नावलौकिक वाढेल.मातेकडून लाभ होतील. मुलांची प्रगती पाहून समाधान मिळेल.कोर्ट कचेरी च्या कामात यश मिळेल.शत्रू नामोहरम होतील.

राशिभविष्य कुंभ

या आठवड्यात विशेषतः स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या.नशीब जरी साथ देत असले तरी प्रत्येक वेळी त्याची परिक्षा पाहू नका. कौटुंबिक धन खर्च होणे शक्य आहे. मित्रांचे सहकार्य आणि कुटूंबियांच्या साथीमुळे अशक्य ते शक्य होऊ शकेल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका.

राशिभविष्य मीन

स्वतःच्या चंचलपणाला लगाम घाला. दैवाची साथ चांगली मिळेल.मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेऊ नका.मातेच्या आरोगूयाची काळजी घ्या. निर्णय घेणे सुरुवातीला टाळणेच फायदेशीर ठरेल. आपले कोण आणि परके कोण याची जाणीव या आठवड्यात आपणास होईल.

।शुभं भवतु।।

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ.प्रसन्न मुळ्ये.

वैयक्तिक सल्ला आणी मार्गदर्शन

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular