Homeबिझनेस०१/०४/२०२३ पासून UPI महागणार, आता ₹२०००/- च्या प्रत्येक व्यवहारावर चार्जेस द्यावे लागणार..?

०१/०४/२०२३ पासून UPI महागणार, आता ₹२०००/- च्या प्रत्येक व्यवहारावर चार्जेस द्यावे लागणार..?

०१/०४/२०२३ पासून UPI महागणार, आता ₹२०००/- च्या प्रत्येक व्यवहारावर चार्जेस द्यावे लागणार
👆🏻अशा आशयाचे मेसेज फॉरवर्ड होत आहेत. हे साफ चुकीचे आहे. ०१/०४/२०२३ नंतरही P2P म्हणजेच Peer to Peer व्यवहार (मित्रमंडळी, नातेवाईक यांना पैसे पाठवणे) आणि P2M म्हणजेच Peer to Merchant व्यवहार (म्हणजे UPI द्वारे दुकान इ. अस्थापनांना पैसे पाठवणे) यांना कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत. थोडक्यात, एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे UPI द्वारे पाठवित असाल तर, चार्जेस लागणार नाहीत.

फक्त जे लोक Prepaid Payment Instrument (जसे की Wallet, गिफ्ट कार्ड) चा वापर करतात, त्यांना चार्जेस लागतील. म्हणजे जो Merchant / दुकानदार Wallet मध्ये पैसे स्वीकारतो, त्यालाच चार्जेस लागतील; पण जो Merchant हे पैसे थेट त्याच्या बँक खात्यात स्वीकारतो, तर त्याला चार्जेस नाहीत. हे चार्जेस Merchant Category प्रमाणे ०.५% ते १.१% आहेत.

लोक नेहमीच्या सवयीने खरेदीला जातांना बरोबर कॅश नेणार नाहीत. काही दुकानदार ०१/०४/२०२३ नंतर म्हणतील, “UPI ने पेमेंट केल्यास आम्हाला चार्जेस पडतात, म्हणून जास्तीचे १% द्या.” तरी असे चार्जेस देऊ नका.
कृपया अशा थापांना / अफवांना बळी पडू नका. 🙏🏻

संदर्भ : NPCI अधिकृत माहिती

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular