Homeघडामोडीअकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द - हायकोर्ट

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द – हायकोर्ट

10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते. मात्र आता याबाबत मुंबई हाय कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

ℹ️ नेमका निर्णय काय?

▪️ अकरावीची सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली असून इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

▪️ याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.

📍 दरम्यान, कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular