Homeवैशिष्ट्येआज जागतीक मधमाशी दिन

आज जागतीक मधमाशी दिन

जगातील कोणतीही छोटी-मोठी गोष्ट महत्वाची नाही ,असे होत नाही. जर मधमाशी नष्ट झाली तर सारे जग नष्ट होईल असा शास्त्रज्ञांनी दिला इशारा मी मध्यंतरी कुठे वाचलेला! आज जागतिक मधमाशी दिन आहे. त्यानिमित्त जगातील सर्व छोट्या जीवांचे स्मरण आणि त्यांच्या जीवितासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना आहे.

फुलांना होणारा मधमाशीचा स्पर्श म्हणजेच लोखंडाला परिसाचा स्पर्श होण्यासारखाच असतो. फुलांना मधमाशीचा स्पर्श नवजीवनांस मार्ग देऊन जातो , परिसस्पर्शापेक्षा सामर्थ्यशाली होऊन राहतो. शेतातून सतत सोने पिकवायचे असेल, नवनवीन रोपे, झाडे उगवायची तर मधमाशांची काळजी घेणे गरजेचे आहे.
आपल्याकडील सर्वच शेतकरी स्वतःशेतीचे सर्वच कामे करत असतो. शेतीमध्ये मेहनत करुन सोन्यासारखे पिके तयार करून भरघोस उत्पादने घेत असतो .मात्र आपल्याला उत्पादने घेण्यासाठी व शेती करण्यासाठी मुंग्या, मधमाशा, अनेक प्रकारचे किटक, गांडुळे, साप, पक्षी, सर्वत्र असलेले असंख्य जीवजंतू मदत करत असतात. आणि ह्या सर्वांमध्ये मधमाशा आघाडीवर असतात.

शास्त्रज्ञांचा इशारा वर सांगीतला आहेच. मधमाशी नष्ट झाली तर ४ ते १० वर्षांतच मानवजात नष्ठ होण्यास सुरुवात होईल.कारण मधमाशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीकरन (pollination) घडवून आणण्यात मदत करीत असतात. अनेक फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला पिके व धान्यपिके यांचे परागीभवन फक्त मधमाशीच करु शकते. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन तयार होत नाही, ते अन्न खाण्यासाठीही पौष्टीक नसते.
आपण अलिकडे अनेक डाळिंब बागायतदार मधमाशांच्या पेट्या बागेत ठेवतात असे बघतो. कारण की सफरचंद, डाळिंब व इतर लिंबुवर्गिय व तत्सम पिके यांचे परागीभवन फक्त आणि फक्त मधमाशीच करु शकते. डाळिंबातील नरफुले व मादी फुले वेगवेगळी असतात. मधमाशी नर फुलातील पराग उचलुन मादी फुलावर सोडतात . यामुळे डाळिंबातील मादीफुले फलीत होऊन फळात रूपांतर होते.जितक्या वेळेस मधमाशी नरफुलातील पराग मादीफुलावर आणून सोडेल तितक्या प्रमाणात डाळिंबाचे फळे आकाराने मोठी होतात. हे आज आपल्याला समजले आहे. मात्र मधमाशांना काय आवडते हे ,आपल्याला अजुनही माहीत नाही किंवा आपण समजाऊन घेण्याचा प्रयत्न करत नाही. मधमाशांना पोळे तयार करायला कोणती झाडे आवडतात?. जसे – बोर , बाभुळ ! मधमाशांना मकरंद गोळा करण्यासाठी काय आवडते. जसे – सुर्यरफुल…वगैरे !

   सेंद्रीय शेतीचा व जैवीक शेतीचा गाभा म्हणजेच मधमाशी होय. ! मधमाशांनी जास्त वेळा फुलांना स्पर्श केला तर अशा फुलापासून तयार होणाऱ्या फळावर रोग आणि किडी यांचा प्रादूर्भाव ही कमीच असतो. मधमाशांनी अनेक वेळा स्पर्श केलेल्या फुलापासून तयार होणाऱ्या फळांची आंतरीक संरचना सदृढ  असते आणि कोणत्याहि सदृढ वनस्पतीवर रोगाचा प्रादूर्भाव कमीच असतो. मधमाशीचा फुलांना झालेल्या स्पर्शावरच फळांचा आकार, रंग , स्वाद आणि दर्जा अवलंबून असतो. स्वपरागीभवना पेक्षा मधमाशाद्वारे परागीभवनातून (pollination) निर्माण होणारे फळे , वनस्पती जोमाने, भरदार, ऊंच व सदृढ वाढलेली असतात. यावरुन मधमाशांचा फुलांना केलेला स्पर्श किती महत्वाचा आहे हे लक्षात येते. मधमाशांनी जितक्या जास्त वेळा फुलांना स्पर्श केला तर तितक्या प्रमाणात डाळिंबाच्या फळांच्या आकारात वाढ होऊन उत्पादनात वाढ मिळते हे वर पाहिलेच, म्हणूनच मधमाशी शिवाय उत्पादनात वाढ होऊच शकणार नाही हे प्रथमता  स्विकारणे गरजेचे आहे.

मानवजातीला निसर्गाने निसर्गातील जैवीक विविधता अबाधीत राहावी म्हणून मधमाशीच्या रूपाने जैवीक- परिस बहाल केला आहे. मात्र हा जैवीक परिस उपलब्ध असुनही तो वापरण्याचे ज्ञान व कौशल्य मानवजातीने आत्मसात न केल्यामुळे पीक ऊत्पादन वाढीचे सर्व प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहे…
लिंबूवर्गिय झाडांच्या फुलांचे फळात रूपांतर करण्यात मधमाशा आघाडीवर असतात. सफरचंद , डाळिंब व तत्सम लिंबूवर्गिय फळे जोपर्यंत पृथ्वीवर मधमाशा आहे तोपर्यंतच आपण बघु शकतो. ज्यावर्षी पृथ्वीवरून मधमाशा नष्ट होतील त्याचवर्षी पृथ्वीवरून हे फळे देखिल कायम स्वरुपी नष्ट होतील. हे आपण शेतकऱ्यांनी वेळीच लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे. माणसामुळे मधमाशांच्या जीवनशैलीत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. मधमाशांनी नैसर्गीक आदिवासामंध्ये बदल केला आहे आणि तोही फक्त आणि फक्त माणसांच्या चुकामुळेच. म्हणुन ईथुन पुढे जगण्यासाठी मधमाशा वाचवणे हे मानवजाती पुढील मोठे आव्हान असनार आहे.
जेव्हा झाडांना फूले येतात व त्या फुलांचे फळात रूपांतर होते हा कालावधी २० ते ३० दिवसांचा असतो ह्या कालावधीमंध्ये झाडावर कुठलंही रासायनीक किटकनाशक फवारणी करु नये. रासायनीक किटकनाशकामुळे मधमाशा मरतात व काही रासायनीक किटकनाशकामुळे मधमाशींचा स्मृतीभ्रंश होतो. त्यामुळे त्यांना ज्या पोळातून आल्या आहेत, त्या पोळाचा रस्ता सापडत नाही. म्हणुन झाडांच्या फुल निघेल्यापासुन ते फुलाचे फळात रूपांतर होणाऱ्या २० ते ३० दिवसांच्या कालावधीत मधमाशांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. ह्याचबरोबर अलिकडे polly house व शेडनेट मधील शेती वाढत आहे. अशा polly house व शेडनेट मधील शेतीमंध्ये परागीभवनासाठी मधमाशा असणे ही महत्वपुर्ण गरज आहे. म्हणून शेतकरी मधमाशांचे पोळ किंवा पेटी आपल्या polly house किंवा शेडनेट मध्येदेखील ठेवतात. त्यातच किटकांच्या प्रादूर्भावा पासून बचावासाठी YELLOW STICKY PAD ही वापरतात ह्या YELLOW STICKY PAD ला अडकून मधमाशा मरतात . म्हणून मधमाशांचे पोळ किंवा पेटी ठेवलेल्या POLLY HOUSE किंवा शेडनेट मध्ये YELLOW STICKY PAD लाऊ नयेत.
मधमाशा मधपेटी किंवा पोळा पासून २ ते ३ कि. मी. अंतरावर जाऊन मध गोळा करत असतात व एका फेरीत १० फुलापासुन ते मकरंद उपलब्धते नुसार १०० किंवा त्यापेक्षा जास्त फुलावर बसत असतात. मधमाशा राणीमाशी, नरमाशी व कामकरी माशी अशा प्रकारात असतात. व प्रत्येकाची कामे ठरलेली असतात. थंडी वाढली की मधमाशा काम करत नाही कारण की पोळामधील पिलांना थंडीपासून इजा होऊ नये ,तसेच पोळामधील वातावरण स्थिर राहावे म्हणुन, एकमेकांच्या शरीराची उब निर्माण होण्यासाठी पोळावर गर्दी करुन बसतात . ह्या कालावधीमंध्ये गोळा केलेल्या मधावरच मधमाशा गुजरान करीत असतात. निसर्गतःच निसर्गातुन थंडी आणि कडक ऊन्हाळ्यात मधमाशांना अन्न उपलब्ध होऊ शकत नाही. तेव्हा पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत रसायन विरहीत गुळाचा पाक करुन मधमाशांच्या पोळापासून १० ते ५० फूट अंतरावर ठेवावा.
इथे प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवने गरजेचे आहे. मधमाशा ह्या पाझरणारेच पाणी पितात किंवा गाळातील पाणी पीतात. प्रत्यक्ष पाण्यात उतरून मधमाशी कधीही पाणी पीत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये कृत्रीम पाणवठे निर्माण करायला शिकले पाहीजे…
फळपिकांचे अर्थकारण मधमाशी भोवतीच फिरते म्हणुन मधमाशांची काळजी घेणे गरजेचे आहे…

(आधारित )
राजेंद्र गुरव,यमाई औंध

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular