Homeबिझनेसउत्तुंग भरारी

उत्तुंग भरारी

आजही  काहीतरी छान विषय आहे पण या विषयावर तुम्ही सर्वजण विचार करायचा आहे आणि मुळात तो आपल्या आयुष्यात अंमलात आणायचा आहे.

मी एक गोष्ट सांगत आहे एका व्यक्तीची तिच्या प्रवासाची त्यावरून तुम्हीही  तुमचा प्रवास अभ्यास करू शकता ,  त्या प्रवासात येणाऱ्या अडचणी वर उपाय शोधू शकता त्यावर चिंतन करून मार्ग शोधू शकता.

आठवत का तुम्हाला थॉमस एडिसन काय म्हणाले होते,

 बिजली के बल्ब के आविष्कार करने में कड़ी मेहनत करनी पड़ी थी . बल्ब बनाने में 10 हजार बार से अधिक बार असफल हुवे . जिसपर उन्होंने कहा ” मैं कभी नाकाम नहीं हुआ बल्कि मैंने 10,000 ऐसे रास्ते निकाले लिए जो मेरे काम नहीं”  आ सके’.

अशीच एक गोष्ट आहे सोमनाथ  नावाच्या व्यक्तीची कर्नाटकातील एका मोठ्या गावात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम  लहानपणा पासून आई वडिलांसोबत कष्ट करत करत शिक्षण पूर्ण झाले. नोकरी करत उदर निर्वाह करत आपले आयुष्य समाधानी जगत होते. परंतु काही राज्य  सीमा मतभेदामुळे ती ही नोकरी त्यांना गमवावी लागली.  पुन्हा नव्याने उभारी करण्याचे सामर्थ्य एकवटणे म्हणजे प्रथम मनाची तयारी करणे, आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे असते.  प्रयत्नाने  त्यांनी एक चांगली नोकरी मिळवली. पुन्हा का मिळकतीची चिन्ह आशात्मक दिसू लागली,  पण म्हणतात ना कधी कधी वेळ ही खूप खराब असते.  अशीच परिस्थिती त्यांच्यावर ओढवली पुन्हा ती नोकरी संकटात आली. किती मोर्चे केले किती सभा भरवल्या तरी काही केल्या कामगारांना योग्य तो न्याय मिळत नव्हता.  शेवटी ती ही नोकरी हातून निसटली.

आता काय करावं पुन्हा प्रश्न , आई वडिलांना सांभाळणे , घर सांभाळणे , मुलाच्या शाळेची फी भरणे , एक नोकरी आयुष्यात खूप बदल घडवून आणते . हे तुमच्या आमच्या सर्वां च्या  बाबतीत घडत.

पाय हळू हळू व्यवसाय कडे वळू लागले. काही कालावधी गेला चहा ची टपरी कोल्हापूर शहरात चालवून पहिला प्रयत्न सुरु केला. त्यात नाश्त्याचे पदार्थ आणि इतरही काही खाद्य पदार्थांचे प्रयत्न केले.

सोमनाथ यांनी  समाजसुधारक गाडगे बाबा  यांच्यावर कविता करून लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप निर्माण केली. परंतु मनासारखा व्यवसाय तिथे ही चालू शकला नाही. अश्यावेळी बहुतेक जण वैचारिक पातळीवर शांत होऊन जातात मनात वेगवेळे विचार आणि डिप्रेशन मध्ये निघून जातात , पण यांनी पुन्हा नवीन प्रयन्त पुन्हा नवीन काहीतरी शिकणे ,त्यातून घडणे हा च मार्ग निवडला,  वेगवेगळे प्रयोग करत राहिलें . त्यांचे मोठे  बंधू अमोल ही  नेहमी येणाऱ्या अडचणीत त्यांच्या सोबत असत.

असेच दिवस जात होते , काट्या तुन पाय ठेवत मार्गक्रमन चालू होते.

न डगमगता तिथून त्यांनी नवनवीन व्यवसाय पद्धती अवलंबल्या , काही मध्ये अपयश आले तर काही नवीन शिकण्यास मिळत होते. अश्या वातावरणात  नवीन प्रवास सुरु झाला तो म्हणजे गावोगावी बेकरी प्रॉडक्ट्स पोहचवत पोहचवत शून्यातून विश्व निर्माण केलं . त्यात ही त्यांनी नवनवीन कला शिकल्या त्या अवगत केल्या एक व्यावसायिक होण्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत यांचा पुरेपूर अभ्यास केला त्यात ते यशस्वी झाले . फक्त व्यवसायच केला असे नाही त्या दोघांनी  गावोगावी जाऊन लोकांच्या मनात आपली एक सुंदर प्रतिमा निर्माण केली. प्रामाणिक पणा आणि समाधानाची छाप सोडली.

काही वेळे नंतर  या व्यवसायासोबतच  पुन्हा एकदा नव्याने पीठ  गिरण व्यवसायास प्रारंभ केला . या व्यवसायात आपल्या ला कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यावर नीट अभ्यास करून आपल्या तब्बेती वर त्या व्यवसायाचा काही दुष्परिणाम न व्हावा या दृष्टीने हे विचार करून या व्यवसायाचा  कायापालट च बदलवून टाकला . छोट्या जागेवर सुरु केलेली ही सुरुवात आज भव्यदिव्य स्वरूपात उभारली गेली आहे.  हे सर्व घडलं कश्यामुळे त्यांच्या संयमामुळे , कष्टा मुळे , प्रयत्नामुळे , जिद्दी मुळे , नवनवीन काहीतरी शिकण्यामुळे .

एकंदरीत हा प्रवास माझ्या भावाचा आहे. सांगण्याचा तात्पर्य इतकंच आहे . सोमनाथ आणि अमोल यांच्या आयुष्यासारखे प्रवास आपल्या आयूष्यात ही असतात.  कभी ख़ुशी कभी गम म्हणण्यापेक्षा आपल्या आयुष्यात दुःखाचे दिवस खूप असतात , आपण नेहमी येणाऱ्या संकटाना सामोरे जाणे हेच दुःखातून सुखाकडे जाण्याचा प्रवास आहे . एखादी गोष्ट मिळवण्यात जितका आनंद असतो त्यापेक्षा जास्त आनंद आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा दिसत ते म्हणजे आपले कष्ट एखादया गोष्टीला मिळवण्याचा साध्य करण्याचा अतोनात प्रयत्न . तो आनंद खूप जास्त असतो .

नोकऱ्या आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. सरकारी नोकरी करून ही आजकाल घर चालवता येत नाही तर सामान्य माणूस काय करेल. वाचकांना विनंती आहे की आपल्या आयूष्यात असं काही अडचणी त असाल तर प्रयत्न करत रहा जास्त करून तुम्हाला ज्या गोष्टी विषयी माहिती असेल त्याच्यावर पुढे जाऊ शकाल. प्रयन्तांनी परमेश्वर,  चुका आणि शिका , यशस्वी व्हा . आणि अशीच यशाची उत्तुंग भरारी घ्या. 

फक्त इंजिनिअर आणि डॉक्टर होण्याचीच स्वप्न उरी बाळगू नका , आपल्या भागातील , आपल्या गावातील उत्पादनात जागतिक पातळीवर आणण्याचं काम ही करा . व्यसन सोडून नवनवीन उपक्रम राबवा त्यातून शिका. सर्वाना नोकऱ्या हव्यात , पण मी म्हणेन व्यवसायाकडे वळा. आपल्या महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातील व्यक्ती येऊन चहा टपरी काढून छोटे छोटे धंदे करून लोक मोठे झाले पण आपल्यात व्यवसाय करण्याची लाज खूप असते . आपण हे कसे करू शकतो , चहा कसा काय विकणार ? माझे च मित्र मला चिडवतील , असे प्रश्न फेकून द्या. जे चिडवतील तेच एक दिवस तुमचे नाव काढतील . आणि चिडवणरे तुमचे घर चालवण्यास येत नाहीत . तुमचं घर , तुमचा संसार हा तुम्हालाच योग्य रीतीने चालवायचा आहे . तुमच्या आई बाबाची औषध बाहेरचे टोमणे मारणारे लोक आणून देणार नाहीत . लाजणं सोडाल तर जगण समजून जाईल.

मी तर जात आहे माझ्या दादाच्या उदघाटनाची तयारी करण्यास , तुम्हीही तुमच्यातील जिद्दी माणसाला जागृत करा , आणि भरवा असेच उदघाटन सोहळे , येणाऱ्या पिढीला तुमची गरज आहे , इन्स्टा , फेसबुक वर फालतूचे रील्स पाहून आयुष्य नाही घडणार आहे , असे काही घडवा स्वत: ला जग नाव काढेल तुमचं , आणि समजा प्रयन्त करूनही अपयश च येत असेल तरीही दुःख मानून बसू नका , आपण काय कष्ट केले हे आपल्याला माहित आहे त्यात ही समाधान मानत जगा . आणि जगण्याचा आनंद घेत रहा. 

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद

रुपाली शिंदे

भादवन ( ता . आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. खूप खूप आभारी आहे.
    माझ्या प्रवासाबद्दल आपण उत्कटेने लिहल, या प्रवासात सर्वात मोठी साथ लाभली ती संभाजी ब्रिगेड विचारांची, बुट पॉलिश ते तेल मालीश कोणताही व्ययसाय करण्याची प्रेरणा…..
    जो काही जीवन प्रवास, परिश्रम आहेत त्याबद्दल खूप आनंदी आहे.आयुष्यातील सर्व अडचणींनी नवीन शिकण्याची उर्मी निर्माण केली. शून्यातून प्रगती करताना कामातला आनंद खूप समाधान देतो.

- Advertisment -spot_img

Most Popular