Homeसंपादकीयकंगना राणावत ची दुसरी बाजू

कंगना राणावत ची दुसरी बाजू

बॉलिवूड आणि मायानगरी हे शब्द कानावर पडताच एकच नाव समोर दिसते ते म्हणजे मुंबई. इथं कित्येक लोक आपले नशीब अजमवायचा प्रयत्न करतात. त्यात काही यशस्वी होतात तर काही नाही . त्याला कारणे ही आहेत त्यातील राजकारण , वातावरण आणि संस्कृती ही प्रत्येकाला जमेलच असे नाही . बॉलिवूड मध्ये कोणाचे सूत कोनाशी कधी जुळेल ह्याचा काहीच नेम नसतो. प्रसिद्धी, पेसा , झगमगाड , याच्या मागे लागलेले अनेकजण असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे कंगना राणावत. ही मुलगी मूळची हिमाचल प्रदेश ची पन प्रचंड मेहनतीआणि फॅशनेट असणारी कंगनाने मुंबई मध्ये बॉलिवूड स्टार म्हणून ओळख कमावली. पण मुंबई मध्ये नवख्या असणाऱ्या कंगणाचा प्रवास सुखकर होता ?
कंगना ने चित्रपट सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले त्यामुळे तिची चर्चा असायची यामुळेच ती प्रसिद्धी च्या झोतात होती. सर्व सुखे पालखाली लोळण घेत . पण हे तिला एका रात्रीत तर नक्कीच मिळाले नाही . त्यासाठी तिने अपार कष्ट अपमान सहन केले असतील म्हणून तर ती क्वीन म्हणून नावारूपाला आली. पण जेवठे प्रशंसक तेवठे टीकाकार हे स्वाभाविक पण आलेच असो .. काही दिवसांपूर्वी तिची सतत चिडचिड होत होती ; त्यामुळे अनेक वादाना सामोरे जाण्याची वेळ तिच्यावर आली. आपल्यापैकी कित्येकांनी तिच्यावर तोंडसुख घेतले पण तिच्या चिडचिड पणा का झाला ह्याचे कोणी आकलन केले का ? आपण आज थोडे तिच्या आयुष्यात नजर टाकली पाहिजे..

चित्रपट प्रवास


वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या कुटुंबीयांचा विरोध झुगारून ती दल्लीत गेली तिथे थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर मुंबई मध्ये कोणतीही पाश्वभूमी नसताना आली. बॉलिवूड मध्ये कोणी गॉडफादर किंवा पाश्वभूमी नसताना आले की प्रस्थापित लोकांचा काय त्रास होतो ते त्याच व्यक्ती समजू शकतात ज्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करीत हे कडू अनुभव घेतले आहेत. वेळोवेळी तिने आपला गैरफायदा कोणी व कसा उठवला हे प्रसिद्धी माध्यमातून व्यक्त केले; त्यावेळी आपल्या बद्दल लोक काय विचार करतील ह्याची तमा न बाळगता सत्य समोर आणण्याची हिंमत तिने दाखवली. त्यामुळे या महिलेचे कौतुक करायला हवे होते ; इतर अबला महिलांच्या वर अन्याय होतो तेव्हा आपण ज्या प्रकारे व्यक्त होतो त्या प्रमाणेच हिच्या बाबतीतही व्यक्त व्हायला हवे होते पण आपण का कचरलो ते आजतागायत पडलेलं कोड आहे . ती आताच का बोलली त्यावेळी का बोलली नाही अशीही काही लोकांनी मते मांडली ; पन त्यावेळी जर या प्रस्थापिता बद्दल बोलली असती तर तिचा आवाज तुमच्या- आमच्या प्रयत्न पोहचला असता का? असा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा असे मला वाटते. (आज तिच्या एका ट्वीट ची देशपातळीवर बातमी होत होती पण त्यावेळी तिची दखल किती लोकप्रिय वृत्तसंस्थेनी घेतली असती? ) आताचे तिचे हे वर्तन भूतकाळातील धगधगणारी ज्वाला ही असू शकते. कदाचित तिची ही भूमिका आपल्याला पटणार ही नाही. पण म्हणून आपण तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही.
काही राजकीय व्यक्ती तिचा स्वहितासाठी फायदा करून घेत असतीलही ; सुशांत सिंग बद्दल ची वक्तव्ये ती करत होती. मुंबई किंवा पोलिसांवरील आक्षेपार्ह विधाने चुकीचीच होती .मुख्यमंनत्र्यांचा एकेरी उल्लेख पण अक्षम्यच ; पण
म्हणून बीएमसी च्या कारवाई चे समर्थन करणे हे पण चुकीचे ठरेल. ह्यात तिने महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबई बद्दल आक्षेप घेतला आणि तिथंच चुकली आणि टीकेची धनी झाली ही टीका होणेही क्रमप्राप्त होतेच म्हणा..
संघर्ष, शारीरिक, मानसिक वेदना नेराश्य हे असह्यच पण त्यातही टिकली आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकली . पण त्या लोकांबद्दलचा राग तिने आज स्वतःला यशस्वी झाल्यानंतर व्यक्त केला. बॉलिवूड मध्ये काय चालते हे स्वानुभवातून शिकली आणि तेच कथन केले असावे . जसं की ती कोणत्याही अवॉर्ड कार्यक्रमात जात नाही कारण तिथं आधीच सगळं ठरलेलं असत असे तिला वाटतं. असे असले तरी तिला तीन वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार , चार वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाले आहेत याशिवाय भारत सरकारच्या पद्मक्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तीच काय चुकलं असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे . राजकीय पक्ष आणि नेते स्वहित साधत असतातच तेव्हा कलाकारांनी मी कोणत्याही गोष्टीवर बोलू शकतो अश्या अविर्भावात बोलू नये.
अभेनेत्री म्हणून नेहमीच तुझा आदर राहील..

टीप -: लेखात तुझा एकेरी उल्लेख फक्त आमच्या जवळची आहेस हे दाखवण्यासाठी आहे. तुझ्याबद्दल अनेकांची अनेक मते असू शकतात.

तुझ्या अभिनयाचा आणि चिकाटीचा चाहता

अमित अशोक गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular