Homeघडामोडीदेश सेवा बजावलेल्या निवृत्त सैनिकाचे कोल्हापूर जिल्ह्यात अनोखे स्वागत.

देश सेवा बजावलेल्या निवृत्त सैनिकाचे कोल्हापूर जिल्ह्यात अनोखे स्वागत.

आजरा (अमित गुरव ) -: बारावी शिक्षणानंतर परिस्थिती वर मात करत नियमित व्यायाम करत ते सैन्यात भरती झाले होते.
आजरा तालुक्यातील मडिलगे हे छोटेसे गाव. निवृत्त नाईक सुभेदार संभाजी विष्णू घाटगे हे दि. १/१/२०२१ रोजी २४ वर्षे देशसेवा बजावून सेवा निवृत्त झाले.

  नाईक सुभेदार घाटगे यांनी हैद्राबाद ,सिकंदराबाद , पंजाब , दाजीलिंग, गाँल्हेर , हुबळी ,बेळगाव , या ठिकाणी हवालदार या पदावर देश सेवा बजावत जम्मू काश्मीर नैसेरा सेक्टर वरून नाईक सुभेदार या पदावरून ते निवृत्त झाले . 
        ते गावी आल्यानंतर त्यांचे ठोल-ताश्यांच्या गजरात  जंगी स्वागत ग्रामस्थांनी केले. त्यांनी श्री भावेश्वरी देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी महिलांनी आरती करून मिरवणुकीत लक्षणीय सहभाग नोंदवला. 
    गेल्या २-३महिन्यात अनेक जवान शहीद झाले ;दरम्यान च्या काळात घाटगे आपण माझी काळजी करू नये मी देशसेवा करत असून माझे कर्तव्य पार पाडत आहे असे सर्वाना सांगितले होते. त्यांच्या सुखरूप परत येण्याची डोळ्यात तेल आणून वाट पाहणाऱ्या कुटुंबातील आई , पत्नी , मुलगा , मुलगी या सदस्यांना त्यांना पाहून मिठी मारली व आपल्या आनंदाश्रू ना वाट मोकळी केली. 
                जिल्ह्यात प्रत्येक सैनिकाना आपल्या गाडीतून मोफत घरी पोहचविण्याची सेवा देणारे माजी सैनिक मंगेश सोनार (रा. दुगूनवाडी ता- गडहिंग्लज ) यांनी  गावी आणले होते. 
          यावेळी स्वागत मिरवणुकीत नामदेव हासबे, चद्रकांत घाटगे, पत्रकार संभाजी जाधव, तसेच  के. व्ही. येसने, शिवाजी घाटगे, जनार्धन निऊगरे , धोडिबा घाटगे, बापु निऊगरे, मारुती भोगले, संभाजी हासबे, सचिन निऊगरे, शामराव हासबे, पुंडलिक घाटगे, सुरज निऊगरे, आदिनाथ जाधव, अभिजीत मोहिते, निलेश घाटगे, सचिन घाटगे, अक्षय घाटगे, जोतिबा येसने, आनंदा मुरुकटे, संतोष घाटगे, धोडिबा हासबे, सह गावातील ज्येष्ठ मंडळी पाहुणे नातेवाईक ग्रामस्थ आदींनी या स्वागत मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या मिरवणुकीत त्यांचे स्वागत व सांगता ही राष्ट्रगीताने झाली. आजरा तालुक्यात  प्रथमच निवृत्त सैनिकांचे अनोखे स्वागत करण्यात आले . 
        ज्या व्यक्तींने आपल्या साठी किंवा भारतीयासाठी आपल्या सुखाचा त्याग केला . त्यांच्यासाठी असाच उपक्रम आपण आपल्या गावात ही करावा. आणि देशसेवा बजावणाऱ्या प्रेत्येक सैनिकला मानवंदना दिली तर त्यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा ही  उर नक्कीच भरून यईल. असे आम्हाला वाटते. लिंक मराठी कडून भारतीय 
सैनिकांना मनाचा मुजरा.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular