उत्तूर
-:कर्पेवाडी तालुका आजरा येथे डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट उत्तूरच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विठ्ठल कदम उपस्थित होते. अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष पूनम अस्वले, डॉ. सचिन पोवार, विद्या पोवार यांच्या हस्ते सदर साहित्याचे वाटप झाले. डॉ. पोवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी उपाध्यक्षा शीतल कुदळे, कल्पना भाइगडे, वनिता पाटील, राघवेंद्र पाटील, प्रीती कांबळे, ग्राम पंचायत सदस्या सुमन कदम व सोनाबाई कदम, साधना यादव यांच्यासह बहुसंख्येने पालक,नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक व स्वागत गणपती नागरपोळे यांनी केल. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका वनिता पाटील यांनी केले तर आभार विद्या पोवार यांनी मानले.
ोफोटो तपशील – कर्पेवाडी येथे पोवार ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करताना पुनम अस्वले, डॉ. सचिन पोवार, विठ्ठल कदम, विद्या पोवार व इतर
मुख्यसंपादक