Homeसंपादकीयजनतेच्या जिवापेक्षा प्रोटोकॉल महत्वाचा आहे का ?

जनतेच्या जिवापेक्षा प्रोटोकॉल महत्वाचा आहे का ?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे सर्व मुख्यमंत्रांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. सर्व राज्यात कोरोनाची सद्या काय परिस्थिती आहे हे समजण्यासाठी त्यांनी केलेला हा स्तुत्य उपक्रमासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले.
पण असे करत असतानाच केजरीवाल यांनी एक चूक केली के ते कॉन्फरन्स live करत होते. हे समजताच मोदी यांनी त्यांना धारेवर धरण्याचा पवित्रा घेतला खरा ; पण केजरीवाल हे live आहेत त्यांची फॅन्स बँक मोठी आहे हे ओळखून / राजकारणात खुलेआम कोणाला किती धारेवर धरायचे यांची जाण असल्याने ते संयमी भूमिका बजावताना दिसले.
एक सामान्य नागरिक म्हणून विचार केला तर केजरीवाल यांनी ४ भिंती आडची मीटिंग live करायला नको होती . कदाचित त्यांच्या वडिलोपार्जित सत्तांसल्याने त्यांना हे कुणी जाणकार लोकांनी सांगितले नसेल . पण प्रश्न उपस्थित होतो की असे का ? काय ती मीटिंग इतकी गोपनीय होती की माझ्या राज्यात ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाहीत त्यामुळे माझा फोन सतत खणखणत असतो , की ह्या हॉस्पिटलमध्ये फक्त २-३ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक आहेत लवकरात लवकर पुरवठा व्हावा गंभीर परिस्थिती उत्पन्न होत आहे. उद्या जर त्यांनी सांगितले की फक्त ३० मिनिटांचा ऑक्सिजन साठा बाकी आहे त्यावेळी मी केंद्रात कोणाला फोन करू? अशी त्यांच्या जनतेसाठी आर्त हाक मारत मोदींना पाझर फोडण्याचा प्रयन्त करणे हे कितपत गोपनीय आहे .
कदाचित इतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोशल मीडियावर केंद्र देत नाही -राज्याला सांभाळता येत नाही अश्या प्रतिक्रिया व्यक्त करत बसण्यापेक्षा मी यावर काय उपाय करू शकतो हे जाणून विचारपूर्वक live करून कोंडीत पकडले असेल तर दिल्लीची जनता /मतदार त्यांना त्याचे फळ नक्कीच देईल. पण मुख्यमंत्री महोदय तुम्ही सर्वांनी केजरीवालांना साथ दिली नाहीत तर तुमचा सुज्ञ मतदार राजा ही दुसरा पर्याय शोधण्यास सुरवात करेल.
सुज्ञ जनता आता संभ्रमात आहे की प्रोटोकॉल फे फक्त कनिष्ठ लोकांना असतात की वरिष्ठ लोकांना ही? तेव्हा सर्वाना समजू द्या जनतेच्या जिवापेक्षा प्रोटोकॉल महत्वाचा आहे की नाही ?

  • लिंक मराठी टीम
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular