▪ तज्ज्ञांच्या मते खोकला झाल्यानंतर दूध पिऊ नये. दूध प्यायल्यामुळे छातीमध्ये कफ जास्त साठतो आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. खोकला झालेला असताना डेअरी प्रॉडक्ट घेणं टाळावं
▪ तांदूळ थंड प्रकृतीचे असतात. त्यामध्ये कफवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला झाला असेल तर, आणखीन वाढतो. भात खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढू शकतं.
▪ भाताबरोबर दही, मसालेदार पदार्थ, केळं खाऊ नये. (रात्री उशिरा जेवायची सवय करा बंद)
▪ साखर खोकला झाला असेल तर साखर खाणं देखील टाळावं. साखर छातीमध्ये इफ्लामेशन वाढवतं. यामुळे आपली इम्युन सिस्टीम कमजोर होते आणि सर्दी खोकला बरा होत नाही.
▪ कॉफी खोकला झाल्यास चहा आणि कॉफी दोन्ही टाळायला हवं. कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असतं. कॅफिनमुळे स्नायू डिहायड्रेट होतात.
▪ मद्यपान केल्यामुळे छातीमध्ये इफ्लामेशन वाढण्याने जास्त त्रास होतो.
▪ खोकला झाला असेल तर, साय नसलेलं दूध हळदीसोबत घ्यावं. हळद सर्दी, ताप, खोकला या आजारात प्रभावी ठरते. एक ग्लास दुधात थोडीशी हळद घालून प्यावं आल्याचा काढा करूनही पिऊ शकतात. त्यासाठी आलं, थोडं मिरी आणि मध वापरावं.
▪ गरम पाणी पित रहावं, त्यामुळे कफ पातळ होतो आणि छातीला आराम मिळतो. गरम पाण्यात पुदिन्याची पानं आणि ओवा घालून वाफ घ्यावी. याशिवाय पुदिना, ओवा, कापूर, निलगिरी मिक्स करून तयार केलेला आयुर्वेदिक लेप गळ्यावर लावावा. गरम पाण्याने गुळण्या करण्याने घशाला शेक मिळतो.
- बशीर मुल्ला
मुख्यसंपादक