Homeक्राईमगडहिंग्लज तालुक्यात लाखोंच्या बनावट नोटा जप्त

गडहिंग्लज तालुक्यात लाखोंच्या बनावट नोटा जप्त

गडहिंग्लज ( अमित गुरव )-: महागाव येथे बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या टोळीला गडहिंग्लज पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून 100 , 200 , 500 रुपयांच्या जवळपास 1 लाख 88 हजार च्या नोटसह मोटारसायकल जप्त केली आहे. यासाठी पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके , उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली . सोबत हेडकाँन्स्टेबल बाजीराव कांबळे , राजकुमार पाटील , नामदेव कोळी , दादू खोत , दीपक किल्लेदार , गणेश मोरे पथकात होते .

अनिकेत शंकर घुले ( वय 20 महागाव ) , संजय आनंदा वडर (वय 35 नेसरी ) , अब्दुलरजाक मकानदार (वय 25 चिकोडी ) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून कसून चौकशी सुरू आहे.
गणपती च्या या उत्सवात नोटांचा हा बाजार मांडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण होणार हे नक्की.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular