परिचय:
चपाती पिठाचे गुलाब जामुन रेसिपी: क्लासिक डेझर्टला एक अनोखा ट्विस्ट | चपाती चे गुलाब जामुन ही एक आनंददायी फ्यूजन मिष्टान्न आहे जी चपातीच्या ओळखीच्या चवीसोबत पारंपारिक गुलाब जामुनचा मऊपणा एकत्र करते. ही अनोखी पाककृती प्रिय भारतीय मिठाईला एक सर्जनशील वळण देते. या लेखात, आम्ही चपाती चे गुलाब जामुन कसे तयार करावे याबद्दल चरण-दर-चरण सूचना देतो, तुमच्या चव कळ्यांसाठी एक स्वादिष्ट आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करतो.
साहित्य:
चपाती पिठासाठी:
1/2 कप गव्हाचे पीठ
1/2 कप मिल्क पावडर
1 कप साखर
1.5 कप पाणी
1 टेबलस्पून साजूक तूप
1/4 टीस्पून बेकिंग सोडा
1/2 टीस्पून वेलची पावडर
4-5 केशर काडया
7 टेबलस्पून दूध
सूचना:
स्टेप 1
एका वाटी मध्ये चाळणीत गव्हाचे पीठ, मिल्क पावडर, बेकिंग सोडा घालून चाळून घेणे. काही घाण असेल तर निघून जाते.
स्टेप 2
त्यात तूप घालून चांगले मिक्स करून घेणे. पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. म्हणजे तूपाचे प्रमाण बरोबर आहे. लागल्यास तूप घालावे.
स्टेप 3
दूध गरम करून, थंड केलेले असावे. एकेक चमचा दूध घालत पिठ चपातीच्या कणकेपेक्षा थोडे मऊ मळून घेणे.तूप लावून पुन्हा एकदा हाताने चांगले मळून घेणे.हव्या त्या आकाराचे गुलाबजाम तयार करून घेणे.
स्टेप 4
गुलाबजाम तेलात किंवा तुपात मंद आचेवर लालसर तळून घ्यावेत.तळताना चमच्याने सतत हलवत राहावे म्हणजे सर्व बाजूंनी छान तळले जातात. सर्व गुलाबजाम तळून घ्यावेत.
स्टेप 5
एका पातेल्यात साखर व पाणी घालून चिकट पाक करून घ्यावा. *1-2 तारी पाक करायचा नाही. वेलची पावडर व केशर काडया घालून घेणे.
स्टेप 6
पाक तयार झालावर, तयार गुलाबजाम त्यात घालून 1-2 मिनिटे झाकण ठेवून उकळवून घेणे. गॅस बंद करावा. 3-4 तास मुरण्यास ठेवून द्यावे. गुलाबजाम आकाराने मोठे झालेले दिसतात.