गडहिंग्लज (अमित गुरव) -: शिवकृपा सहकारी पतपेढी शाखा गडहिंग्लज येथे आज महिला दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. महिला सभासदांनी संस्थेविषयी मनोगते व्यक्त केली त्याच सोबत आम्ही या संस्थेत जोडले गेलो त्याबद्दल समाधानी आहोत अश्या प्रतिक्रिया दिल्या. याप्रसंगी आदर्श व सक्षम उपस्थित महिलावर्गाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सूत्रसंचालनाची सूत्रे वृषाली भोसले यांनी आपल्या खाद्यावर घेऊन कार्यक्रमाची शोभा वाठवली . माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी घुगरी , ऍड. निता आंबी , गडहिंग्लज तालुका आरोग्य अधिकारी डॉ गीता कोरे, गडहिंग्लज पोलीस कॉ. सौ.रेश्मा लोहार , श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स संचालिका सौ.रेखा पोतदार , गडहिंग्लज नगरपरिषद मधील आरोग्य विभागाच्या अधिकारी सौ. शारदा सातपुते तसेच शिवकृपा पतपेढी कोल्हापूर विभागाचे वसुली प्रमुख राजेंद्र साळुंखे , शाखाधिकारी राजाराम पोतदार तसेच सर्व स्टाफ आणि संस्थेचे ठेवीदार , हितचिंतक , महिला वर्ग उपस्थित होता.
मुख्यसंपादक