Homeआरोग्यजाई (चमेली) चे आरोग्यासाठी फायदे

जाई (चमेली) चे आरोग्यासाठी फायदे

जाईचे फूल जेवढे सुंदर आणि सुगंधी आहे. तेवढेच ते आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असते.

१) जाईच्या फुलांचा वास घेतल्याने मन प्रसन्न होते. व मानसिक ताण तणाव निघून जातो.

२) दहा-पंधरा जाईची पाने घेऊन थोडीशी चेचुन घ्यावी व अर्धा कप तीळ तेला मध्ये टाकून कडवुन घ्यावीत. हे तेल ड्रॉप मध्ये भरून ठेवा रात्री झोपताना कानामध्ये टाकावे. यांनी कानाचे तक्रारी कान दुखणे कानामध्ये खाज येणे बंद होते.

३) एक चमचा जाईच्या पानांचा रस यामध्ये एक काळी मिरी चूर्ण मिसळावे हे मिश्रण पिल्याने मळमळ-उलटी त्वरित बंद होते.

४) दहा-पंधरा जाईची पाने घ्यावीत व एक ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळावे या पाण्याने चुळा भरल्याने दात दुखणे कमी होते . हिरडे मजबूत होतात,हिरड्यातून रक्त येणे बंद होते.

५) तोंड आल्यानंतर दोन-तीन जाईची पाने चावून खावी दिवसातून दोन-तीन वेळा तोंड लगेच निघून जाते. शरीरात वाढलेली उष्णता ही कमी होते.

६) जायची मुळी उगळुन त्वचेवर लावल्याने गजकर्ण नायटा झपाट्याने कमी होतो.

७) ताप आल्यानंतर जाईची थोडीशी एक इंच(१.५-२gm) मुळी घेऊन स्वच्छ धुवावी तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळावे आणि एक कप झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकावी. व हा काढा घोट घोट पिवून झोपावे. यामुळे अंगातून घाम निघून जाऊन ताप कमी होतो.

८) जाईचा रस कृमिनाशक आहे.

९)अर्धा कप जायचा रस आंघोळी आधी केसांना लावून हलक्या हातांनी मसाज करावी व पंधरा वीस मिनिटांने अंघोळी करावी. यामुळे केसांची वाढ होते,केसातील कोंडा निघून जातो, केस मजबूत होतात.

१०) एक चमचा जाईच्या पानाचा रस यामध्ये पाव चमचा धने पावडर मिसळून सकाळी उपाशीपोटी पिल्याणे लघवी साफ होते. व लघवीच्या तक्रारी निघून जातात.

  • निसर्गोपचार तज्ञ

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular