Homeघडामोडीनरसेश्वर मंडळ भादवण कडून सालाबाद प्रमाणे श्री. नरसेश्वर जयंती साजरी होणार

नरसेश्वर मंडळ भादवण कडून सालाबाद प्रमाणे श्री. नरसेश्वर जयंती साजरी होणार

आजरा -: नरेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भादवण मुंबई या मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री नरसेश्वर जयंती सोहळा रविवार दिनांक 11/ 5 /2025 रोजी संपन्न होणार आहे.


यावेळी सकाळी नऊ वाजता नर्सेश्वर अभिषेक तर बारा वाजता सत्यनारायण पूजा नवविवाहित जोडपे श्री व सौ स्वाती मयुर चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते असणारे हे जोडपे 10 मे रोजी विवाह बंधनात बांधले जातील. त्यांनी आम्हाला हा मान देऊन मंडळाने सन्मानच केला अशी प्रतिक्रिया लिंक मराठी मध्ये दिली. नरसेश्वर जयंती सोहळा कीर्तनकार ज्ञानदेव शिंदे आणि निवृत्ती केसरकर तसेच भादवण मधील वारकरी यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता संपन्न होईल. देणगी दारांचा सत्कार व वृद्ध लोकांना काठी वाटप सायंकाळी 6:30 वाजता श्री. उमेश आपटे ( माजी अध्यक्ष जि .प .को ) आणि डॉक्टर हनुमंत शिरगुप्पे ( संस्थापक अध्यक्ष अनुराधा अर्बन को ऑफ क्रिकेट सोसायटी लिमिटेड ) यांच्या हस्ते करण्यात येईल. महाप्रसाद रात्री आठ वाजता दत्त पंती भजन रात्री दहा वाजता आयोजित करण्यात आले आहेत.


विजय विष्णू खुळे ( अध्यक्ष ) सखाराम डोंगरे ( उपाध्यक) , बाळासाहेब डोंगरे (सेक्रेटरी ), शंकर कांबळे ( खजिनदार ) तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमासाठी Link Marathi यांनी मिडिया पार्टनरशिप केली आहे.

व्हॉट्सअँप चॅनल लिंक

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

युट्यूब चॅनेल लिंक

https://www.youtube.com/channel/UC0BSqSm-XEb3uoc2OUSEoRQ

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular