पुणे – रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा जिजाई रमाई समाज भूषण पुरस्कार २०२१ प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांना जाहीर केला असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची कन्या म्हणून डॉ. दाभोळकर यांचा वैचारिक आणि सामाजिक वारसा पुढे नेण्याचे काम डॉ. दाभोळकर यांच्या निधनानंतर त्यांनी सातत्याने सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन, राज्यभर विविध दौरे करून, लेखन – व्याख्यानाच्या माध्यमातून जिवाची पर्वा न करता निर्भिडपणे खंबीरपणे करीत आहेत. मुक्ता दाभोळकर यांचे अभिमानास्पद समाजकार्य प्रेरणा देणारे आहे.
जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार येत्या 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुण्यातील शनिवार वाड्या जवळील, लाल महल येथे संपन्न होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्रेड मुक्ता मनोहर, मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या किरण मोघे, अॅड. वैशाली चांदणे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले आहे.
मुख्यसंपादक