भाग १५
नियंत्रण म्हणजे काय ?
१०) नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये स्वयंसेवी संस्थेची ध्येय-धोरणे व उद्दिष्टे ठरवली जातात. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक तो ढाॅंचा, प्रणाली, लोक आणि त्यांचे दायित्व या गोष्टी संघटन प्रक्रियेमध्ये काम केले जाते.
११) नियंत्रणामुळे कामगिरीचा सतत आढावा घेणे, नियोजनानुसार कामकाज चालले आहे व स्वयंसेवी संस्था ठरविलेल्या मार्गावर योग्य रीतीने काम करते आहे न हे पाहणे शक्य होते. प्रत्यक्ष कार्यसिद्धी अंदाजपत्रकात ठरविल्याप्रमाणे कितपत आहे, जत अपेक्षा व कृती यामध्ये फरक असेल तर तो फरक निफ्टून काढण्यासाठी कार्य कारवाई आवश्यक आहे ते ठरविणे व तसे उपाय योजणे याचाही नियंत्रणामध्ये समावेश होतो.
अंदाजपत्रक व अंदाजपत्रकीय प्रक्रिया
१२) अंदाजपत्रक हि एक व्यवस्थापन शैली आहे आणि म्हणूनच अंदाजपत्रकिय प्रक्रियेला “ व्यवस्थापनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची व वापरण्याची प्रक्रिया” असे म्हणता येईल. दुसर्या प्रकारे सांगायचे झाले तर भविष्यात करावयाच्या नियोजित कृती आज आकडेवारीत व्यक्त प्रक्रिया म्हणजे अंदाजपत्रकीय प्रक्रिया असेही म्हणता येईल.
अंदाजपत्रकाचा उपयोग काय ?
१३) अंदाजपत्रामुळे संघटनेची दीर्घकालीन उद्दिष्टे व अल्पकालीन उद्दिष्टे यात सामंजस्य निर्माण होते. अंदाजपत्रकामुळे विविक्षित आकडेवारी उपलब्ध होत असल्यामुळे निश्चित काय अपेक्षित आहे हे स्पष्ट होते. तसेच भविष्यकालीन उद्दिष्टे ज्यांवर आधारित असतात त्या अपेक्षांचे व गृहीतांचेही स्पष्टीकारण होते.
१४) अंदाजपत्रक म्हणजे कोणत्याही नियंत्रणप्रणालीचा गाभाच असतो. कारण अंदाजपत्रकामुळे आपल्याला कोठे जायचे होते, आपण कोठे आहोत, आपण आहोत तिथेच का आहोत, आणि अजून किती व कसा पल्ला गाठावयाचा आहे याचे सम्यक ज्ञान होते.
सर्वसाधारणपणे अंदाजपत्रक हे खालील प्रमुख उद्दिष्टासाठी तयार केले जाते.
🔹संघटनेकडे उपलब्ध असलेली साधने व त्यांच्या उपयोगातून अपेक्षित परिणाम याबाबत निश्चित मार्गदर्शन तत्वे उपलब्ध करून देणे.
🔹प्रकल्प व साधने यात संयोग साधणे.
🔹नियंत्रण प्रणालीची मानके ठरविणे.
🔹स्वयंसेवी संस्था/ व्यवस्थापन/ व्यवस्थापक यांच्या कामकाजांची परीक्षा करणे.
🔹उपलब्ध साधनातून जास्तीत जास्त कार्यभाग साधणे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
– माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक