Homeघडामोडीनेते घरात आणि कार्यकर्ते मैदानात आणि मतदार मात्र शेतात

नेते घरात आणि कार्यकर्ते मैदानात आणि मतदार मात्र शेतात

आजरा -: ( अमित गुरव ) – सर्व महाराष्ट्रात जरी निवडणुकीचे वारे घुमत असले तरी आजरा तालुक्यातील काही गावात मिळमिळीत अवस्था आहे.
यांचे कारण जाणून घेतले असतात असे जाणवले की सध्या माझा ऊस कसा शेतातून बाहेर जाईल ह्या गडबडीत शेतकरी वर्ग आहे. तर काही ठिकाणी घराणेशाही ला आणि सर्वसामान्य कार्यकर्यांना डावलून स्वतःचीची पोळी भाजणार्या बड्या नेत्याच्या कार्यपध्दती बद्दल असंतुष्ट असणाऱ्या काही युवा पिढीने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने निवडणुकीत सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या मते आम्हाला गावाला नवी दिशा द्यायची आहे बराच विकास साधायचा आहे. असे असताना मात्र काही नेते हे कार्यकर्ते नसल्याने सद्या नाईलाजाने घरीच चर्चा व बेठकी घेताना दिसतात.
अश्या परिस्थितीत नवीन आलेले युवक बाजी मारतात की त्यांच्या पॅनल चा फायदा विद्यमान सत्ताधारी किंवा विरोधकांना होतो ते येत्या काहीच दिवसातच स्पष्ट होईल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular