चंदगड ( प्रतिनिधी ) -: आज रोजी अथर्व दौलत कारखान्याचा 42 वा गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन मा.मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ.व श्री. प्रमोद सटूपा ओऊळकर रा.तुर्केवाडी आणि होम हवन पूजा सौ व श्री गणपतराव हनुमंतराव देसाई रा.बागिलगे यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कार्याक्रमामध्ये त्यांनी कारखान्याच्या आगामी योजनांबद्दल बोलतेवेळी म्हणाले अथर्व -दौलत साखर कारखान्याच्या 42 व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन शुभारंभ आज उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झाला. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या अथर्व दौलत कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या जमानीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षण, ऊस विकास, असे नवनवीन उपक्रम राबवणार असून यामध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता दहा हजार पीसीडी (पर डे क्रशिंग कॅपेसिटी) करण्यात येणार असून, या गाळप क्षमतेमुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन ऊसाचे होणारे नुकसान थांबणार आहे. याव्यतिरिक्त, कारखान्यात 30 मेगावॅटचा को-जेनरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, जो ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तसेच, कारखान्यात 200 केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे इथेनॉलच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिक ऊस दर देणे शक्य होईल. या प्रकल्पांची माहिती देताना चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की, “आम्ही या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहोत. या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा सर्वोत्तम दर देण्याचे आमचे ध्येय आहे. यावर्षी आम्ही सात लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गाळप क्षमतेतील वाढ आणि नवीन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दर वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ॲड . संतोष मळविकर यांनी खोराटे साहेबांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, “राजकारण आणि अथर्व-दौलत हे दोन्ही विषय वेगवेगळे असून, मानसिंग खोराटे साहेब निश्चीतपणे दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल राखतील. त्यांच्या नेतृत्वाखाली दौलत कारखाना हा महाराष्ट्रातील एक नंबरचा कारखाना होईल, अशी आम्हा सर्वांना आशा आहे.
दौलत कारखाना आणि आमच्या घरातील संबंध हे नेहमीच अत्यंत स्नेहपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे राहिले आहेत. कामगार, शेतकरी, सभासद या सर्वांसाठी आमच्या कुटुंबाचे योगदान हे कायमच राहणार आहे, असे युवा नेते संग्रामदादा कुपेकर यांनी असे सांगून त्यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगनाथ हुलजी बोलतेवेळी मानले की, अथर्व इंटरट्रेड ही व्यवहारिक कंपनी असून राजकारण आणि कारखान्याचा एकत्रिकरण कधी करणार नाही ही बाब त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली.
अथर्व-दौलत कारखान्याच्या यशस्वितेचा हा गळीत हंगाम शेतकऱ्यांसाठी नवा आरंभ ठरेल, अशी अपेक्षा आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगनाथ हुलजी,बाळाराम फडके,बसवराज आरबोळे,ह.भ.प.संजय पाटील,प्रकाश चव्हाण,अशोक जाधव (दौलत चेअरमन), यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला बी.एम.पाटील, राजवर्धन शिंदे-सांबरेकर, बाळासाहेब हाळदनकर, शशीकांत रेडेकर, सतीश सबनीस, जे.जी.पाटील, आर.आय.पाटील, सुनील नाडगौडा, रवी नाईक, अशोक भोगण,विश्वनाथ ओऊळकर,उदयकुमार पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, एम.आर.पाटील(जी.एम),दत्तकुमार रक्ताडे,(प्रोसेस,जी.एम.) शेती अधिकारी-सदाशिव गदळे, शेतकरी,तोडणी वाहतूकदर, सभासद, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रू लाड व आभार संभाजी साळुंखे यांनी मांडले.
मुख्यसंपादक