१९८० च्या उच्च न्यायालयात निर्णय झाल्याप्रमाणे पंतप्रधान पदी नियुक्ती होण्यासाठी लोकसभेत बहुमत सिद्ध करावेच असे म्हंटले नाही. राष्ट्रपती हे एकाद्या व्यक्तीस पंतप्रधान बनवू शकतात व ठराविक कालावधी मध्ये त्यांना लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगू शकतात.
१) चरण सिंग (१९७९)
२) व्ही. पी. सिंग (१९८९)
३) चंद्रशेखर (१९९०)
४) पी. व्ही. नरसिंहराव (१९९१ )
५) अटल बिहारी वाजपेयी (१९९६ )
६) एच. डी. देवगौडा (१९९६)
७) आय. के. गुजराल (१९९७ ) ८) अटल बिहारी वाजपेयी (१९९८ )
यांनी पंतप्रधान पद धारण केल्यानंतर बहुमत सिद्ध केले.
पंतप्रधान पदी नियुक्त झालेले मुख्यमंत्री –
१) मोरारजी देसाई (मुंबई राज्य)
२) चरणसिंग (उत्तर प्रदेश)
३) व्ही. पी. सिंग (उत्तर प्रदेश)
४) पी. व्ही. नरसिंहराव (आंध्रप्रदेश)
५) एच. डी. देवेगौडा (कर्नाटक)
६) नरेंद्र मोदी (गुजरात) २००१ ते
२०१४ या कालावधीत ते चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते.
संकलन –
लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक