चोपडा (प्रतिनिधी)- अवैध व्यावसायिक आणि गुंडांकडून पत्रकारांच्या जीवाला नेहमीच धोका असल्या कारणाने मागेल त्या पत्रकाराला बंदुकीचे मोफत परवाने देण्यात यावे अशी मागणी भारतीय पत्रकार महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नंदलाल मराठे , जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत, केंद्रीय उपाध्यक्ष, राकेश कोल्हे, जयवंत देवरे, प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, राजकुमार जैन, केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील, केंद्रीय सचिव प्रकाश कासार यांच्या आदेशाने चोपडा तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे. संपूर्ण राज्यभरात अनेकदा पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.त्यामुळे पत्रकारांना स्वयं रक्षणासाठी मोफत पिस्तुल/बंदूक परवाने द्यावेत तसेच चोपडा तालुक्यातील पत्रकारांना कोविड लसीकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ, जिल्हा उपाध्यक्ष विश्राम तेले, तालुका सरचिटणीस किरण देवराज, तालुका उपाध्यक्ष कांतीलाल बा पाटील, छोटू वारडे, संपर्क प्रमुख जितेंद्र कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यसंपादक