अमित गुरव ( नवी दिल्ली) -: शेतकरी आंदोलन मध्ये स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता पत्रकारिता केली. ती केली नसती तर आंदोलनाची माहिती शेतकऱ्यांनाच झाली नसती. फेसबुक live आणि युट्युब वरून मोठ्या- मोठ्या स्पर्धकाशी त्यांनी स्पर्धा केली . त्यामुळे सरकार विरुद्ध बोलणाऱ्या पत्रकाराना खटला व चौकशी तुन घाबरवण्याचे व त्याना संपवायचे हे लोकशाहीला खूप धोकादायक आहे.
स्वतंत्र पत्रकार मनदीप पुनिया व धर्मेंद्र यांना चौकशी साठी ज्या पध्दतीने वागणूक दिली त्याचा निषेध सर्वांनी केला पाहिजे ; अश्या प्रकारे त्यांचा आवाज बंद करु पाहतात ते सामान्य माणसाला समजले पाहिजे. जर आज ते दुर्लक्ष केले आणि सत्ताधारी लोक अश्या पत्रकारांना घाबरवण्यात यशस्वी झाले तर पुठे कोणी पत्रकार असे धाडस करण्यास धजनार नाही. तेव्हा त्यांना लवकरात लवकर सोडवावे.
दिल्लीचे पोलीस ही अशी घटना योग्य मानत नसतील ; मग त्यांचा पडद्या मागचा सूत्रधार कोण ? हे जनतेने ओळखावे. तसेच पत्रकारांच्या अश्या अटकेचा पोलीस अधिकाऱ्यांनी ही विरोध करायला हवा होता .
मुख्यसंपादक
अगदीं बरोबर