Homeसंपादकीयपुढाऱ्यांनो नुसतेच शेतकर्‍याच्या दारावर फिरण्याचे काम करू नका

पुढाऱ्यांनो नुसतेच शेतकर्‍याच्या दारावर फिरण्याचे काम करू नका

दरवर्षी कधी पावसाविना तर कधी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होतं ज्यावेळेस शेतीला पूर्णपणे खर्च लागलेला असतो त्या वेळेसच हा निसर्गाचा प्रकोप होऊन बळीराजाचं प्रचंड नुकसान होतं हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो आणि हातबल झालेला कर्जबाजारी झालेला कष्ट करून पार थकलेला शेतकरी भुईसपाट होतो किलकिल्या डोळ्यांनी मायबाप सरकार कडे पहात राहतो कुठे आमदार आणि खासदार येईल अधिकारी येईल आपल्या झालेल्या नुकसान पाहून आपल्याला मदत करेल मात्र तसे होत नाही होतं काय आमदार येतो खासदार येतो अधिकारी येतात पंचनामे होतात फोटो काढले जातात बातम्या येतात शेतकऱ्याच खोटं खोटंच सांत्वन केलं जातं आणि हे कागदी घोडे फाईल मध्ये कायमचे बंद होतात कधीच कुठल्या शेतकर्‍यांना भरघोस मदत मिळत नाही त्याला लागलेल्या खर्चाच्या एक पट ही मदत त्याला मिळत नाही शेती ला खर्च किती लागतो एक रुपयाचे उत्पन्न असेल तर 70 पैसे खर्च लागतो आणि सरकार देत किती त्याच्यामध्ये त्याच्या निंदणी चा एक हात ही होत नाही यावर्षी मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे उडीद मूग मका सोयाबीन हलक्‍या जमिनीचा कापूस त्यांचं नुकसान झाल त्याच्या नंतर आता भरपूर पाऊस पडतोय या पावसान भारी जमिनीच्या कापसाचं व इतर पिकांच जमिनीत पाणी धरुन नुकसान होत आहे त्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने काही भागांमध्ये शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल आहे मात्र अजूनही हे कपाळकरंटे पुढारी कृषीचे कर्मचारी ढुंकूनही पाहत नाहीत आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे कोलमडून पडला आहे आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये एक वयोवृद्ध शेतकरी धायमोकलून रडतो आहे त्याची केळीची बाग कापूस आणि मका पूर्णपणे उध्वस्त झाला आहे त्याच्या वागण्यातून त्याच्या डोळ्यातून त्याच्या वेदना टप टप जमिनीवर पडत आहेत स्वतःला शेतकऱ्यांचे नेते समजून घेणारे राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधलेले शेतकरी नेते सगळ्याच संघटनांचे प्रमुख आता बिळात जाऊन बसले आहेत आरे लबाडा नो ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता मांडता एकही प्रश्न न सोडवता तुम्ही आमदार खासदार झालात तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे नुसते आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी नीतिमत्ता ही लागते राजकीय पुढा-यांच्या गाडी अडवून त्यांना जाब विचारण्याची एका ही शेतकरी नेत्यांमध्ये धमक नाही कारण प्रत्येक शेतकरी नेत्याने कुठल्या ना कुठल्या राजकीय पार्टीशी लगीन गाठ बांधून घेतले आहे आज पर्यंत आलेली सगळीच सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातली होती आणि आहेत कुठल्याच सरकारने शेतकऱ्यांचा न्याय दिला नाही शेतकऱ्याला व शेतीला दुय्यम स्थान देऊन ह्या लोकांनी शेतीचा सत्यानास करून ठेवला आहे यांना देशातील कारखाने व्यापार वाचवायचा आहे व वाढवायचा आहे मात्र संपूर्ण व्यापार उद्योग कारखाने निव्वळ शेतीच्या भरोशावर उभे आहेत हे विसरून चालणार नाही ते देशातील विचारवंतांना पत्रकारांना टीकाकारांना भाष्यकारांना व साहित्यिकांना सगळ्यांना कळत आहे मात्र कोणीच बोलत नाही जे कृषी तज्ञ आहेत ते सुद्धा या विषयावर शांत आहेत जगातील कुठलीही वस्तू बनवण्याचे कारखाने आहेत मात्र अन्न बनवण्याचा कारखाना फक्त शेती शेतीच आहे आणि तोच दुर्लक्षित झाला तर संपूर्ण देश जग अन्नाला मौतात होईल तो दिवस आता लांब राहिलेला नाही म्हणून कृषी तज्ञांनो कृषी अधिकाऱ्यांनो आमदार- खासदारानो आप आपल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करा शेतकरी पर्यायाने शेती वाचवा नुसतेच शेतकऱ्याच्या दारावर (म्हणजेच माणूस मेल्यावर जातात तसे) फिरण्याचे काम करू नका.

  • संतोष पाटील
    7666447112

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular