मुंबई 🙁 प्रतिनिधी )- ६ जानेवारी MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) आरक्षण रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. २०१९ च्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरलं जाणार आहे.
२०१९ च्या पोलीस भरती संदर्भात शासनाचा नवा आदेश आला आहे. यंदाची पोलीस भर्ती ही अंदाजे तीन हजार पदांसाठी होणार होती. पण कोविडमुळे गेल्या वर्षभरात पोलीस भर्तीच झालेली नाही. गेल्या सप्टेंबरमध्येच गृहमंत्र्यांनी मेगा पोलीस भर्तीची घोषणा केली होती.
राज्यात १२ हजार ५२८ पदांसाठी पोलीस भर्ती होणार असली तरी मराठा संघटनांच्या विरोधामुळे अद्याप नव्या पोलीस भर्तीची जाहिरातच निघालेली नाही. राज्यात १२,५२८ पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. लवकरच राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील उपरोक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.
मुख्यसंपादक