Homeघडामोडीश्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान हरपवडे विभाग आजरा यांच्याकडून शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान हरपवडे विभाग आजरा यांच्याकडून शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

हरपवडे ता.आजरा येथे तिथि नुसार शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला.पहाटे ज्योत ही रामतीर्थ -शिवतीर्थ आजरा -साळगाव -पेरणोली -हरपवडे कडे पोचलो. कार्यक्रमाची सुरवात ही महीला लेझिम खूप छान पद्धतीने झाली. त्याबद्दल सर्व महीला लेझिम पथकाचे मनःपूर्वक आभार.त्यानंतर सरपंच श्री सागर पाटिल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.श्री बाळासो पाटिल यांच्या हस्ते देवीची आरती झाली.सर्वांना अल्पोहार देउन संध्याकाळच्या कार्यक्रमाची सुरवात झाली.


सायंकाळी ठीक ९.०० वा. कार्यक्रमाची सुरूवात झाली.धारकरी आदर्श भिमराव हळवणकर यांनी सुञसंचालन,मनोगत व श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान हरपवडे यांच्या कार्याविषयी सांगितले.हरपवडे गावचे सेवा निवृत्त पोलिस श्री.पांडूरंग गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या नंतर युवा किर्तनकार श्री.नितेश महाराज रायकर यांचे शिवचरित्र या विषया वर आधारित व्याख्यान सुरू झाले.व्याख्यान झाल्या नंतर धारकरी कुमार महादेव पाटील यांनी प्रेरणामंञ आणि ध्येयमंञ घेतले.


तसेच आम्हाला विषेश सहकार्य हे श्री.रामराव जाधव यांनी डेकोरेशन साठी सहकार्य केलं आणि श्री.सुरेश गुरव यांनी सर्व महिलांना फेटा बांधून तसेच महाराज आले होते त्यांना फेटा बांधून आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि श्री.बबन लटम यांनी आपला टेम्पो मधून स्टेज आणण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, साउंड सिस्टम साठी श्री.संभाजी पोवार यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल धारकरी आकाश परशुराम जाधव यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देउन सन्मान करण्यात आला. या कार्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान हरपवडे (विभाग-आजरा) धारकरी कुमार महादेव पाटील, आदर्श भिमदिप हळवणकर,आकाश परशुराम जाधव,नितीन शिवाजी मळेकर, अनिकेत सुरेश लटम, आदित्य रमेश सावंत, प्रथमेश संभाजी पोवार,अमोल पोवार,सिध्देश गुरव,श्रेयस पोवार उपस्थित होते…

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular