Homeवैशिष्ट्येप्रेमविवाह आणि सप्तपदी (अरेंज मॅरेज)

प्रेमविवाह आणि सप्तपदी (अरेंज मॅरेज)

प्रत्येकाच्या जीवनात लग्न सुद्धा एका संस्कारापैकी एक आहे. एक गाणे ऐकायला तसेच पाहायला खूप सुरेख वाटते-
स्वर्ग हा नवा, वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा, वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा

ऐक साजणी या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा

चिमणे घरटे सजले साजरे
इवले सुख हे फुलले आज रे

भरले घर हे आनंदाने
मन हे गाते गीत तुझे ऐक ना
प्रत्येकजण आपले लग्न व्हावे, आपल्या जीवनात साथीदार असावा असे स्वप्न पाहत असतो. या लग्नाच्या दिवशी दोघेही तसेच आप्तेष्ट – मित्र मंडळी खूप खुश असतात. त्या दिवशी खूप उत्साहित वातावरण असते. शंकाच नाही असे वातावरण सप्तपदी असते. या दिवशी जवळचे तसेच दूरचे पाहुणे एकत्र येऊन जीवनातील या अनमोल प्रसंगाचे साक्षीदार होऊन जातात. आशीर्वाद देणे व घेणे हे खूप महत्त्वाचे असते. हा आशीर्वादच संसारातील अडी अडचणीच्या वेळी अदृश्य रूपाने त्यातून सुटका करून बळ देण्याचे काम करत असतो. हा आशीर्वादच दोघांचे नाते मजबूत आणि कणखर बनवत असतो. या दिवशी आई वडील तसेच जवळचे नातलग शेवटी रडत असतात. हे रडणे म्हणजे त्या वधू प्रती असणारे प्रेम तसेच जिव्हाळा असतो. आनंद अश्रूच असते ते.
आपण सर्वजण जाणतो की, पूर्वीच्या लोकांचे वैवाहिक जीवन हे खूप कणखर आणि मजबूत होते. शेवटपर्यंत साथ देणारे नाते ते असायचे. याचे कारण म्हणजे सप्तपदी. त्या वेळी बहुतेक लग्न आई वडिलांच्या पसंतीवरून होत असे.
काळ वेळ बदलत गेला. सध्या लग्न स्वतः मुले मुली स्वतःच्या पसंतीने करू लागले आहेत. प्रेम विवाह, स्वतःला आवडेल त्याच्या समवेत लग्न करणे म्हणजे प्रेमविवाह. जेव्हा आई बाप असले प्रेमप्रकरण ऐकतात तेव्हा पार गळून पडतात. जन्म देणारी आई अपार वेदना सहन करून जन्म देते, आई वडील मुलांचे संगोपन करून त्यांना चांगले शिक्षण देतात. मुला मुलीचा जीवनातील जोडीदार कसा हवा याचे स्वप्न ते सुद्धा पाहत असतात. आपल्या मुला मुलीचा जोडीदार चांगला असावा तसेच त्यांचा संसारसुद्धा उत्कृष्ट व्हावा ही प्रामाणिक इच्छा त्यांची असते.
मी असे ऐकले आहे की, बिहार आणि काही राज्यांत आपल्या मुलगा आणि मुलीसाठी जोडीदार त्यांचे वडील ठरवतात आणि बघण्याच्या कार्यक्रमाला स्वतः फक्त वडील असतात. ना मुलगा मुलगी एकमेकांना पाहतात. योग्य अयोग्य ते ठरवतात. मी तर म्हणेन ही प्रथासुद्धा काही प्रमाणात बरोबर आहे, कारण त्या ज्येष्ठ लोकांना पारख असते.
प्रेमविवाह शेवटपर्यंत टिकण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ज्या दिवशी पळून जाऊन लग्न करतात आणि जेव्हा ही गोष्ट घरातल्या लोकांना माहिती होते तेव्हा आई वडील आणि आप्तेष्टांना खूप वाईट धक्का बसतो. आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो. पण अशा प्रेमविवाह लग्नात माणसेच नसतात त्यामुळे आशीर्वाद कोठून मिळणार?
सरतेशेवटी इतकेच म्हणेन की, सप्तपदी विवाह हा कधीही चांगलाच.
( टीप: हा विषय खूप नाजूक आहे. काही लोकांना माझे म्हणणे पटू शकणार नाही. मी असेही प्रेमविवाह पाहिले आहेत की ते गुण्या गोविंदाने राहत आहेत आणि ते शेवटपर्यंत टिकले आहेत.)

  • लेखन – श्री. सनी चंद्रकांत कुंभार.
    फोटो – सौ. नूतन सनी कुंभार.
    गडहिंग्लज

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular