विठुराया पाव आता
द्यावे दर्शन आम्हाला
ओढ लागली भेटीची
विनवितो मी तुम्हाला….१
निवारावे हे संकट
खेळ चाले किती दिन
तुझा महिमा अगाध
तुझ्यापुढे आम्ही दीन…२
जीव माझा तळमळी
येऊ दे मज पंढरी
माझी चुकली रे वारी
मंत्र राम कृष्ण हरी…३
अस्त्र तुझे मागे घ्यावे
बंद कर महामारी
डोळे भरून पाहिन
रूप तुझे मनोहरी…४
– किसन आटोळे सर
( वाहिरा ता.आष्टी )
मुख्यसंपादक
कविता, लेख
मॅडम खूप छान कविता लिहिली आहे; तुम्हाला लिंक मराठी वर कविता पब्लिश करायच्या असतील तर सरांशी बोला . किंवा whatsapp करा .
8421666667
उंच उंच घे भरारी …
पंख पसरून हवेत
उंच उंच घेत भरारी
ओढून घे नभ सारा
तोडून आण तारा
भिरभिर क्षितिजावर
शोधून घे किनारा
पाहून ये पलीकडे
अगणित किती पसारा
पसरून दाही दिशांना
भेदून जा वलयांना
घालून ये गवसणी
शोधून आण वारा
उचलून सारा आसमंत
छेदून घे आकाश
चमकून ये वीजेगत
बनून लख्ख प्रकाश
पंख पंख पसरून
उंच उंच घे भरारी …
उंच उंच घे भरारी …
पंख पसरून हवेत
उंच उंच घेत भरारी
ओढून घे नभ सारा
तोडून आण तारा
भिरभिर क्षितिजावर
शोधून घे किनारा
पाहून ये पलीकडे
अगणित किती पसारा
पसरून दाही दिशांना
भेदून जा वलयांना
घालून ये गवसणी
शोधून आण वारा
उचलून सारा आसमंत
छेदून घे आकाश
चमकून ये वीजेगत
बनून लख्ख प्रकाश
पंख पंख पसरून
उंच उंच घे भरारी …
– ईशा जगदाळे
मॅडम खूप छान कविता लिहिली आहे; तुम्हाला लिंक मराठी वर कविता पब्लिश करायच्या असतील तर सरांशी बोला . किंवा whatsapp करा .
8421666667