Homeमुक्त- व्यासपीठबाळ नावाचा बाप माणूस

बाळ नावाचा बाप माणूस

       खरंतर आधुनिक युगात जगत असताना आपल्या सहवासात खूप अशी वैचारिक ,हुशार,चलाक,संवेदनाशील इत्यादी अनेक माणसे भेटत असतात.त्यातून चांगल्या भाषेची ,चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण होत असते आणि यातूनच अनुभव व संस्कार नावाची गोष्ट जी बाजारात विकत घेतो म्हटलं तरी भेटणार नाही अशी गोष्ट मिळते.हेच औचित्य साधून माझ्या अनुभवात आलेली सुंदर अशी हि बोधकथा ज्यातून प्रेरणा,अनुभव,जगण्याची जिद्द,संस्कार ईतर खूप काही सांगून जाते.
    सकाळ झाली आणि पक्षांची कुजबूज सुरू झाली आणि तसा सूर्यहि ङोंगरा आङून वर येऊ लागला.सूर्य उगवताच बाळू हातात खुरप व दोरी घेऊन गवताला गेला.बाळू जन्माला यायच्या आधी बाळूच्या घरची परिस्थिती खूपच छान होती.गावात त्याच्याएवढा श्रीमंत कोणच नव्हता.बाळूचे वङिल मुंबईला कामाला होते.दर पंधरा -वीस दिवसांनी किंवा महिन्यान बाळूचे वङिल आपल्या गावाला येत असत.बाळूची आई खूप ऐशोआरामत जगायची.अंगावर भरपूर दागिणे आसायचे.घरात एखादी आमटीची किंवा भाजाची फोडणी जरी दिली तरी अख्खी ती गल्ली वासाने दुमदुमायची.साध संङासाला जातान सुद्धा  तीच्या बरोबर छत्री व बादली घ्यायला एक बाई आसायची ऐवढ आरामाच आयुष्य जगत होती.पण बाळूचे वङिल खूप चांगला माणूस.दुसऱ्याना खूप मदत करायचा.पण अचानक बाळूचे वङिल वारले.बाळूला आपल्या बापाच प्रेम,छत्रछाया कधी मिळालीच नाही .वङिल वारल्यानंतर कालांतराने बाळूची आई आपल्या नवऱ्याच ज्यानं तिच्यासाठी  सोनंनाणं साठवून ठेवलेल ते आणायला मुंबईला गेली.पण तीला तीथे नवऱ्याच्या कपङ्याशिवाय काही मिळालं नाही .तशी बाळूची आई माघारी आली.
      जसा सूर्य दररोज नवीन दिवस आणत होता तस दिवसेंदिवस बाळूच्या घरची परिस्थिती बेताची व हालाखीची होत गेली.बाळूची आई सोनं -नाणं,भांडी-कुंङी,शेत विकून घरात जेवण करत असायची.बाळूला बापाचं प्रेम मिळलं नाहीच पण आईचसुद्धा कधी प्रेम मिळालं नाही .बाळू पहिलीच शिक्षण सुद्धा पुर्ण करायला मिळालं नाही.तस म्हटलं तर बाळूला शिक्षणात गोङीच नव्हती.त्यावेळी दहा बारा वर्षानंतर पोरं शाळेला जायची.पण घरच्या अशा परिस्थितीमुळ बाळून शाळा सोङली व बाजूच्या मोठ्या घरात गङी म्हणून काम करू लागला.बाळू त्या घरात गुरांना चारा -पाणी व शेतातील सगळी काम करत होता.पण त्याला कधी त्या माणसांनी त्याला कधीच पैसा दिला नाही .दिल ते फक्त दोन वेळच जेवण व चांगले संस्कार.
    दिवस उजङत होता तसा बाळूचा येणारा नविन दिवस हालाखीचाच जायचा १४-१५ वर्षाच्या शाळेच्या वयात बाळू खूप काम करत होता ते फक्त आणि फक्त दोनवेळच्या जेवणासाठी.पावसाळ्यात गुढघाभर चिकलातन ङोक्यावर भला मोठा गवताचा भारा सकाळ संध्याकाळ आणत होता. बाळू लहानाचा मोठा दुसऱ्याच्याच घरात होत होता.ईकङे आई सगळं विकून खात होती .होत नव्हतं ते झाल्यावर बाळूच्या आई जवळ दोन -चार भांडीच उरली .अन्नाच्या शोधात बाळूची आई ङोंरातून करवंद,लाकङ विकायची.शिल्लक राहिलेल्या काजूच्या बागेतील शेतातून काजू विकायची.बाळूच्या आईला देवाने सर्व काही दिलं होतं पण ते तीला व्यवस्थित राखता आलं नाही.बाळूला जसा आधार पाहिजे होता तसा तो बाळूला मिळाला नाही.बाळू अङाणी होता पण चांगला होता.
    अशीच काही वर्षे गेल्यानंतर बाळू कोल्हापूरला कामासाठी म्हणून आला. परिस्थितीची जाणीव असल्याने पोटाच्या खळगी भरण्यासाठी व स्वतःच्या पुढच्या आयुष्यासाठी बाळू एका कंपनीत काम करू लागला.मित्र जोडू लागला.ज्या घरात गडी म्हणून काम करायचा त्या घरचे संस्कार घेऊन आपलं आयुष्य पुढे ढकलत होता.बाळू कंपनीत काम करत करत मित्राची रिक्षा शिकला . कामावरून सूटून संध्याकाळी रिक्षा चालवला लागला त्या मिळालेल्या पैशातून आपली रोजी रोटी भागवू लागला.थोडे थोडे पैसे साठवून नंतर बाळूने रिक्षा घेतली.पैशाने मोठे असलेल्या मित्रां जवळ असताना कधीही मी गरीब आहे असा कधीही भास मित्रांना येऊ दिला नाही . बाळू कधीही कुठल्याही व्यसनाला बळी पडला नाही .अंगात असलेले चांगले विचार ,संस्कार व प्रेम सोबत बाळगून चांगल्या व मोठ्या व्यक्तीच्या सहवासात राहून हळूहळू बाळू राजकीय क्षेत्रात पाय ठेवू लागला.बारीक सारिक लोकांची काम ओळखीन करू लागला.बाळूच शिक्षण जरी नसलं तरी त्याने चांगल्या लोकांच्या सहवासात राहून खूप व्यवहारीक ज्ञानाबरोबर सामाजिक व कायदेशीर ज्ञान प्राप्त केले होते.
     अशाच ऐके दिवशी बाळू गावी आला असताना बाळूच्या पाहूण्यांनी लग्न करायच ठरवलं.गावात असणारी ती बारकी खोली म्हणजेच बाळूच घर होत.लाथ मारेल तिथे पाणी काढणारा मुलगा कधीतरी काहीतरी करून दाखवेल आशा अपेक्षाने बाळूच लग्न झालं.पण काही दिवसांनी बाळूच्या बायकोत व आईत भांडण होऊ लागली.बाळूच्या लक्षात आल होतं की माझी आई माझ्या बायकोला सरळ वागू दित नाही म्हणून बाळू बायकोला घेऊन कोल्हापूरला गेला.भाड्यानं लहान रूम घेतली.अहोरात्र काम करून संसाराचा गाढा पुढे हाकलत होता.कालांतराने  बाळूला पहिली मुलगी झाली ,दुसरी मुलगी झाली .दोघां मुलीचं संगोपन चांगलं करत आसतानाच अचानक एका मित्राने बाळूच्या रिक्षाचं नुकसान केलं ती त्याला परत कधीही मिळाली नाही.हिच गोष्ट बाळूच्या जिव्हारी लागली .सर्व काही  सूरळीत सूरू असताना अचानक आलेल्या या घटनेने पुन्हा बाळूच्या आयुष्यात जुणे दिवस आले.पुन्हा पोठाला मिळेनासे झाले. पोटाला पोटभर जेवण मिळत नव्हत. तरीही बाळू आपल्या मुलांना पोठभर जेवण घालत होता.स्वतः दोघे उपाशी राहून पोरींची पोठं भरवत  होता.आशा परिस्थितीत असतानाही आपल्या परिस्थितीची जाणीव कोणाला कळू देत नव्हता.
   आता मात्र बायकोला व पोरांनी काय घालणार तेव्हा गावाकडंच कुणाच्यातरी शेतात राबून आपलं पोट भरल या आशेने बाळू परत गावात आला.बाळूच्या बायकोला हे सगळं बघून वाईट वाटत होत.पण तीपण धीर देत होती.बाळू दुसऱ्याच्यात राबत होता.पोरं उपाशी राहू नये म्हणून कधी कधी मक्याच्या भरड्याच कालवण करून बाळूची बायको पोरासनी देत होती.त्या सासूबरोबर होणारी भांडण ..पोराचं..होणार हाल अशातच पुन्हा ..मुलगी झाली.तीन पोरी घेऊन बाळू  आपल्या संसार पुढ ढकलत होता.स्वतः शिकाय नाही म्हणून बाळूने कधीच पोरांच्या शिक्षणाच्या आड गेला नाही .पोरांच्या भल्यासाठी राबत होता.कधीना कधी माझी देवाला कळकळ जाणवेल व मला पुढचं आयुष्य चांगलं येतील या आशेने सगळ डोळ्यांत अश्रू ठेवून पुढ जात होता.दोघी पोरीसनी शाळेला पाठवून बाळाला घेऊन बाळूची बायको दुसऱ्याच्या शेतात राबाय जायायची.दुपारचं जेवताना कुणी भाकरी दिली तर नंतर खातो म्हणून घराकडं आणायची व पोरीसनी द्यायची.ईतके दिवस वाईट असतानाही कुठल्याही प्रकारचा अनैतिक विचार न करता धैर्याने संसार करत होते.बाळू व बाळूच्या बायको ला माहिती होते की संसार करत असताना जस बैलगाडीची जशी चाकं बरोबर जातात तसच आपण गेल पाहिजे  कारण जर बैलगाडीच एखाद चाक मागं झाल किंवा सुटल तर बैलगाडी सरळ चालत नाही.तसच संसाराच असत जर नवरा बायको दोघे व्यवस्थित संसारात पुढे   गेले तर ते कोणत्याही संकटाला भित नाहीत आणि हाच विचार मनाशी बाळगून बाळूच्या आयुष्यातील दिवस पुढे पुढे जात होते .  
      तीन मुलींच्या नंतर मुलासाठी  बाळूने देवाकडे मांगण घातलं,आणि काय आश्चर्य अफार भक्ती, देवावर विश्वास ठेवणाऱ्या व सत्याच्या मार्गाने जाणाऱ्या बाळूला देवाच्या आशिर्वादाने मुलगा झाला. दोघेही  खूप आनंदी झाले . पुन्हा बाळूची जबाबदारी वाढली. दुसऱ्याच्या शेतात जायचा तेव्हा त्याच्या डोक्यात एकच विचार असायचा तो म्हणजे " माझी आई बहिणीसमोर माझ्या बायका पोरांच राहणं अवघड आहे.आई पटवून घेत नाही .आपल्याला वेगळ राहवचं लागेल कारण या चार पोरांना घेऊन या बारक्याश्या खोलीत राहण खूप अवघड आहे." असा सारखा सारखा विचार येत असल्याने शेवटी बाळू व बाळूच्या बायकोने ठरवले की आपण बारकंस का आसेना घर बाधूयां.आस म्हणून दोघेही गावापासून लांब असलेल्या तलावाच्या बाजूला बारकी झोपडी बांधली ( बाळू लहान असताना काजूच्या शेतात बाळूच्या आईला फसवून तेथे पाझर तलाव  बांधला पण तो अपूर्ण असल्याने तेथे बाळूच्या आईची जागा पडून होती.) घनदाट झांडझुडप व सापा - किरड्यांची वहिवाट असणारी जागा स्वच्छ केली. चार  महिन्याच्या मुलाला काजूच्या झाडाच्या फांदीवर पाळणा बांधला. बाळाला पाळण्यात झोपवायचं.दोघेजण जमिन उकारायचे.गळणाऱ्या घागरीतन तळ्यातल पाणी आणायच व चिकल करायचा.चांगला मळायचा व संध्याकाळी परत घराकडं जायचं.सकाळी लवकर उठायचं परत शेताकडं यायचं आणि ईटा घालायच्या. परत माती उकारची संध्याकाळी परत गारा करून घराकडं जायचं.

शेताकडं येणा-जाणारी माणसं बाळू व त्याच्या बायकोला हसायचे.कशाला हे करालास …तुझ्याकडणं काय होणार नाही .अस म्हणून हिणवत होते . संध्याकाळी घराकडं चार पोरांना गावात गल्लीतनं जातानं “डोंबाऱ्याचा खेळ आला बघा” अस म्हणून टोमने मारायचे. पण कधीही त्यांना वाईट न बोलता डोळ्यांत अश्रू लपवून मनाशी निश्चित केलेला बाळू व बाळूची बायको पूर्ण करत होते. ईटा घालायच्या त्या वाळवायच्या तेवढयाच त्याच्या भिंती बाधायच्या.कोणताही माणूस सोबतीला न घेता बाळू एकटा करत होता आणि सोबत बायकोची साथ.ना गंवडी,ना सुतार ना कुठला माणूस न घेता तीन पोरीच्यां शाळा शिकवत व बारक्या बाळाला घेऊन बाळूने घर पूर्ण केल्या .आलेल्या अडचणीना तोंड देत होता.आणि यात त्याला देवाचा आशिर्वाद पाठिशी होता.कुणाच्याही आधारावर न राहता मोठ्या मोठ्या संकटाना तोंड देत होता.जिद्द व चिकाटीपणा बाळूच्या रक्तात होता आणि म्हणूनच त्याने मनाशी केलेला निश्चय पूर्ण केला.
ना नोकरी ,ना स्वतःच शेतं.दुसऱ्याच्या शेतात दिवसभर राबायचं. घरात खायला काही नसतानाही मक्याच्या लाह्या ,पोव्हं, मक्याचा भरडा (जो जणावारांना घालतात) कधी कधी आमटीला काय नसलं तर खरडा व भात तर कधी कधी पोरांना कायतरी करून घालून त्यांच पोट भरवून स्वतः उपाशी राहत होते. बाळूबरोबर चांगली आसणारी तेवढीच पाच-सहा माणसे त्याला कधीतरी मदत करायची.आपल्याला जे दिवस आले ते पोरांना येऊ नयेत म्हणून त्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले संस्कारही देत होता.जे बाजारात विकत ही भेटत नाहीत .दिवसेंदिवस असा संसाराचा हा गाडा ओढणारे या दोघांनी स्वतः उपाशी राहत पोरांना चांगलं शिक्षण दिलं.जबाबदारीची जाणीव व आई बाबांनी केलेले कष्टाची जाणीव असल्याने पोरांनीही कोणतीही अपेक्षा न ठेवता मिळल त्यात समाधान मानत होते. कुठलाही हट्ट नाही किंवा काही नाही आणि हेच बाळूच्या आयुष्याला कलाटणी देणारे दिवस येत होते.
आयुष्यात आपण फक्त आपल्यासाठीच जगायच नसत तर दुसऱ्यांसाठीही जगायचं असत या विचाराने अशा संकटातही लोकांची कामं करत होता.समोरचा आपल्याला चांगल म्हणतोस की नाही हे न बघता आपण आपल्या ओळखीणं लोकाची कामं करायची अशी मनाला बाळूने गाठ बांधली होती.पण कधीही बाळूने आपल्या कुटूँबाला माघारी टाकले नाही . कोणतही व्यसन न करणारा असा हा संसाराचा गाढा ओढताना बाळूने व बाळूच्या बायकोने परिस्थिती सुधारत असताना त्याच जागेवर, त्याच मातीत पुन्हा घर बाधलं.पोरीनां चांगल शिक्षण दिलं व चांगल्या ठिकाणी लग्नही लावून दिलं. कुठलाही कामधंदा नसताना दुसऱ्याच्यात राबून एक रूपया नसतानाही शिक्षण , लग्न , घरचं खानंपिणं करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आणि हेच बाळूने करूण दाखवलं होत .पोराला चांगलं शिक्षण देवून त्याला नोकरीला लावलं आणि सोबत समाजसेवेचा वसा पुढे चालवायला शिकवलं.
ईतक्या वाईट परिस्थितीतून चांगले दिवस येत असल्याने गावकऱ्यांच्या मनात बाळूबद्दल आदर निर्माण झाला.समाजसेवा करणाऱ्या आता बाळूची ओळख तालूक्यात झाली.सगळ्यांच्या मनात आदराचं स्थान मिळालं.आता मात्र लोक बाळूला बाळू न म्हणता बाळासाहेब म्हणून हाक मारू लागले . अपार कष्ट ,मेहनत,जुन्या दिवसांची जाणीव ,अनुभव घेऊन परिस्थिती सुधरत जाणारा व आलेल्या परिस्थितीवर मात कशी करावी यासाठी दिलेली प्रेरणा अशी शिदोरी घेऊन फिरणारा बाळू आता सर्वाचा बाळासाहेब झाला .
शेवटी ईतकच सांगावसं वाटत की या मला मिळालेल्या अनुभवातून आपणांस जगण्याची नवी उम्मेद,प्रेरणा मिळते.मित्रांनो आपण लहानाचे मोठे आसताना आपल्यावर आई बाबांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवा त्यांचा आदर करा.त्यांना वृद्धापकाळात साथ द्या .वाईट दिवस आपल्या पोरांना मिळू नये म्हणून त्यांनी खूप कष्ट केलेले असते हि जाणीव ठेवून आपल्या आई बाबांनी केलेले संस्कार आपण पुढच्या पिढीला द्या .आपण जन्माला आलोय ते फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी नाही तर वेळ काढून दुसऱ्यांसाठी ही जगा. कारण त्यातून मिळणारं जे आत्मिक समाधान मिळतं ते कुठल्याही जोकवर मिळत नाही .आज आपण कमवतो ,साठवतो व पण ते जाताना वर घेऊन जात नाही हे कमवलेलं सगळं ईथच सोडून जातो.त्यामुळे जगताना जेवढं मिळल त्यातच समाधान माना व जगा.देव तुम्हाला कधीही कमी पडू देत नाही .कष्ट करा .कष्टाचं फळ कधीनाकधी चांगलच मिळतं.
माझ्या वडिलांच्या जीवनावर हि सत्य आधारित घटना आहे.

  • कु.शैलेश बाळासाहेब मगदुम
    ( निंगुडगे )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular