📌 शेअरच्या किंमतवाढीचे सुखद धक्के देणारा पॉलीकॅब इंडिया लिमिटेड.
• पॉलीकॅब इंडियाचा स्टॉक गुरुवारी एकूणच भांडवली बाजाराच्या तेजीला साथ देत आहे.
• सत्राच्या सुरुवातीच्या काही तासांतच तो ५% ने वाढला आहे.
• तांत्रिक आलेख पाहता या शेअरने खुला=किमान स्थितीसह एक तेजीची कँडल तयार केली आहे.
📌 या सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांची संपत्ती केली वर्षभरात दुप्पट.
• भारत डायनॅमिक्स लिमिटेड ही एस अँड पी बीएसई ५०० गटातील एक आघाडीची कंपनी आहे.
• तिचे मुख्यालय हैदराबाद येथे असून ती एक भारतीय संरक्षण कंपनी आहे.
• कंपनी दारूगोळा आणि क्षेपणास्त्र निर्मिती व्यवसायात कार्यरत आहे.
📌 सहारा समूहाचे घोटाळे; सुब्रतो रॉय यांच्या अटकेसाठी मध्य प्रदेश पोलीस लखनऊत दाखल.
• सहारा समूहातील आर्थिक घोटाळ्यात सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
• या योजनांसाठी काम करणाऱ्या एजंट्सना गुंतवणूकदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
• रॉय दाम्पत्य आणि संचालकांविरोधात मध्य प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.
मुख्यसंपादक