Homeसंपादकीयभोंगे, हनुमान चालीसा, अयोध्या यात्राकुठे चालला महाराष्ट्र माझा तुच सांग मित्रा

भोंगे, हनुमान चालीसा, अयोध्या यात्राकुठे चालला महाराष्ट्र माझा तुच सांग मित्रा

या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचारांच्या व शिवशाहू फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, हे काय चाललंय काहीच कळत नाही. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या या पवित्र भूमी मध्ये राजकीय द्वेषापोटी एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणे, तुमच्यापेक्षा आमचा धर्म श्रेष्ठ असे म्हणून इतर धर्मांचे पंथांचे अपमान करणे, व हे सगळं करून आपले राजकीय हीत जोपासण्यासाठी ही सगळी उठाठेव करणे इतकं फक्त या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. गोरगरीब तरुणांचे माथे भडकवून धार्मिक सामाजिक राजकीय वातावरण अस्थिर करणे हाच उद्योग या राज्यातील नेत्यांचा चाललेला आहे, खरे म्हणजे यांना नेते म्हणणे चुकीचं होईल, कारण नेता काय असतो तो सर्व धर्माचा, समाजाचा, शेवटच्या घटकाचा, विचार करतो व सर्वांना समसमान न्याय देतो अशा व्यक्तीला नेता म्हणतात, ही तर बानगुळ आहेत समाजाच्या जीवावर पोसले जाणारे आणि समाजाला गोरगरीब जनतेला पायाखाली दाबणारे, प्रत्येक राजकीय पक्षाची विचारधारा वेगळी असते हे मला मान्य आहे मात्र त्या विचार धारेमुळे जर समाजात असंतोष निर्माण होत असेल अविचार निर्माण होत असेल तर ती विचार धारा
काय कामाची, आज आपल्या राज्याची काय अवस्था झाली आहे रोज शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, विजेचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरी चे प्रश्न, लग्नाचे प्रश्न, अशा हजार प्रश्न असताना या लोकांना हे असले उद्योग का सुचतात हेच कळत नाही, तसे पाहिले तर हे नेते आपल्या घरात सुरक्षित बसलेले असतात गरीबाची पोर स्वतःला कार्यकर्ते म्हणणारे हे तरुण रस्त्यावर पोलिसांचा मार खातात, यांच्यावर केसेस होतात मात्र या तरुण पोरांना आपण काय करतो हेच कळत नाही, आपल्या बापा पेक्षा हि नेत्याला महत्त्व देणारे तरुण या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनाशाकडे घेऊन चालले आहे, गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये एकही मोठा उद्योग आलेला नाही, किंवा एखादी धरण, विद्यापीठ, तयार झालेल नाही. फक्त एकमेकांचा द्वेष विरोधासाठी विरोध या सगळ्या गोष्टींमध्ये राज्याचा पैसा वेळ वाया जातो आहे, सरकार कोणाचेही असो ही लोकं फक्त बोलतात मात्र करत काहीच नाही प्रेषितांचा, देवदेवतांचा, साधुसंतांचा, विचारवंतांचा, लढवय्या शूरवीरांचा, महाराष्ट्र अधोगतीला जाताना पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही….

                       संतोष पाटील
                   7666447112
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular