Homeवैशिष्ट्येभाग ३७ - स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे ३

भाग ३७ – स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे ३

भाग ३७
स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे

लिखित संवादाबाबत हि काळजी घ्यावी.
▶️ आपण वाचक समोर ठेवून त्यांना समजेल अशा सोप्या भाषेचा वापर.
▶️ योग्य माहिती कमी शब्दात वाचकापर्यंत प्रभावीपाने पोचतेय अशी खात्री स्वतःला पटेपर्यंत पुन्हा पुन्हा लिखाण करा.
▶️ एखाद्या त्रयस्थ व्यक्तीकडून तपासून घ्या. पत्रात नेमके काय पाहिजे ह्याचा उल्लेख अपेक्षीत
▶️ पत्राचे तीन विभाग – संस्थेची माहिती, उपक्रमाची माहिती, मदतीचे निवेदन
▶️ सोपे शब्द, साधी, लहान वाक्य, शब्दांचा योग्य आणि अचूक वापर आणि शब्दमर्यादा पाळली तर त्याचा प्रभाव निश्चितच अधिक चांगला पडतो.
▶️ सर्वसाधारणपणे वापरात नसलेल्या Short Form चा वापर, बोजड शब्द, खूप जास्त विशेषणांचा वापर आणि अति अलंकारिक भाषा टाळा.
▶️ ज्यातून जातीभेद, वर्णभेद किंवा लिंगभेद दिसून येईल अशी भाषा वापरण टाळाव.
▶️ मित्रत्वाची भाषा ‘मी’ ‘आम्ही’ ‘तुम्ही’ अशा शब्दांचा वापर संवादाला वैयक्तिक पातळीवर नेतो आणि असं लिखाण वाचकाच्या मनाला लगेच भावत
▶️ प्रत्येक विषय तोवर रुचीपूर्ण असतो, जोवर वाचणाऱ्याला कंटाळा येता कामा नये.
▶️ एक फोटो १०० शब्दांचे काम करतो.
▶️ पत्रावर दिनांक असावा, स्वाक्षरी करायला विसरू नका.
▶️ पत्राचा नमुना/मसुदा-परिच्छेदाची लांबी, बुलेट पद्धतीचा वापर.
▶️ कार्यक्षेत्रातील लाभार्थीबद्दल जास्त माहिती द्या.
▶️ पत्र भावनिक असावे.
▶️ क्षेराॅक्स सहीचे पत्र पाठवू नका.

पत्र पद्धतीत सुधारणा कशी कराल :
▶️ जोडकार्ड/ पाकीट प्रत्येक पत्राबरोबर जोडणे.
▶️ वेगळ्या प्रकारच्या पाकिटाचा वापर
▶️ मदतीची पोच पावती ताबडतोब देणे
▶️ प्रत्येक दात्यासाठी वेगवेगळे पत्र
▶️ पत्रातील काही भाग स्वहस्ताक्षरात लिहिणे
▶️ आपले म्हणणे कसे मांडाल-क्रमवार घटनांचा आढावा
▶️ संस्थेने निवडलेल्या कार्यक्षेत्रातील लोकांच्या गरजा जाणून घेणे.
▶️ ह्या गरजांचे समर्थन करण्यासाठी आवश्यक ती आकडेवारी संकलित करणे.
▶️ संस्थेचा प्रकल्प व कार्यक्षेत्रातील गरजा ह्यांची समन्वयक आवश्यक
▶️ संस्था व संस्था कर्मचारीवृदांची क्षमता सिद्ध करणे.
▶️ लाभार्थी विषयी अधिक खुलासा-लाभार्थी कोण व्यक्ती/कुटुंब/विशिष्ट समूह/समाज
▶️ प्रकल्पास येणाऱ्या अंदाजे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे.
▶️ दात्यांना मदतीसाठी विविध प्रस्ताव सादर करणे.
▶️ दात्यांनी मदत करण्याजोगी योग्य पार्श्वभूमी निर्माण करणे.
▶️ मदत करण्याच्या संधी उपलब्ध करून देणे.
गोंधळाच्या जाळ्यामुळे गडबडून जाण्यापेक्षा त्यातलेच धागे विणून पुढे जाता यायला हवं आणि आपण सुरु केलेल्या कामासाठी आपल्यालाच मदत उभी करता यायला हवी.

आपल्या संस्थेचे काम १० पेक्षा कमी शब्दात मांडता यायला हवं. काही उदाहरण :-
▶️ अंपगत्व असणाऱ्या मुलांना आम्ही संपूर्ण शिक्षण पुरवितो.
▶️ दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांची आम्हाला काळजी आहे.
▶️ आमचे काम-जंगल वाचवणे.
▶️ मानवी हक्काची पायमल्ली झाली असल्यास त्याचा तपास आणि शहानिशा करण हे आमच ध्येय.

चांगल्या संवादकर्त्याचे आणि निधीसंकलकाचे गुणधर्म :
अ) 🔹सकारात्मक आशादायी
🔹व्यक्तिमत्व
🔹भरपूर उर्जा
🔹व्यावसायिकता
🔹आत्मविश्वास
🔹प्रेरणा देण्याची क्षमता
🔹नेतृत्व गुण
🔹सराव
🔹वाचिक आणि लिखित संवादाची कौशल्य
🔹पद्धतशीर कामाचे नियोजन;नियोजनपूर्ण काम
🔹कामाशी एकरूपता

ब). 🔹कामात सतत नाविन्य आणण्याची क्षमता
🔹कामाच्या पद्धतीत आवश्यक ती
🔹प्रामाणिकपणा संवादात पारदर्शकता
🔹एकावेळी अनेक काम हाताळण्याची क्षमता
🔹सहनशीलता, संयमीपणा
🔹सहृदयता
🔹काळजीपूर्वक ऐकण्याची क्षमता
🔹चौफेर लक्ष आणि मिळालेल्या किंवा संभाव्य
🔹संधीचे सोने करण्याची क्षमता
🔹पाठपुरावा करण्याचे कौशल्य
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular