Homeवैशिष्ट्येभाग ३९ दात्या संस्थेस प्रकल्प सादर करणे

भाग ३९ दात्या संस्थेस प्रकल्प सादर करणे

भाग ३९
दात्या संस्थेस प्रकल्प सादर करणे

प्रकल्प सादर करणे पूर्वीची आवश्यक तयारी
▶️ निधी दात्या संस्थातील महत्वाच्या व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करणे व ह्या संपर्काचा उपयोग चर्चे नुसार करून घेणे.
▶️ संस्थेचा प्रकल्पाबद्ल आशावादी दृष्टीकोन ठेवा.
▶️ संस्थेचे कार्य मांडताना सत्यता व पारदर्शकता ठेवा.
▶️ दात्याच्या वैयक्तिक तत्वांचा आदर करा.
▶️ प्रकल्पाचे अहवाल वेळेवर पाठवा व योग्य देणग्यांची पोच पावती द्या.
▶️ संस्थेच्या महत्वाच्या उपक्रमाविषयी व महत्वाच्या घडामोडी सतत कळवत रहा.
उदा. पत्यातील बदल, एखाद्या महत्वाचे उपक्रम.
▶️दात्याशी उत्कृष्ट संपर्क ठेवा.

निधी दात्या संस्थांना संपर्क साधताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी
▶️ संस्थेचे नाव ऐकिवात आहे का? स्थानिक/ राज्यात/ देशात
▶️ संस्था ठराविक कार्यक्षेत्रात काम करते अथवा सर्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
▶️ संस्था कोणत्या प्रकारच्या लाभार्थीसाठी काम करत. मुले/वृद्ध/ अल्पसंख्यांक
▶️ या क्षेत्रात काम करणारी दुसरी एखादी संस्था आहे काय/ तुमच्या संस्थेचे वेगळेपण काय?
▶️ संस्थेच्या कार्यातील प्रगतीचे टप्पे
▶️ पत्र पाठवण्याचे कारण- आपत्ती संकट निधीमध्ये कपात, नवीन कार्यक्षेत्राची निवड प्रगतीचा आढावा, नवीन कार्यक्षेत्राची निवड
▶️ दात्यांनी मदत दिल्यानंतर काही ठोस बदल घडून येतील का?
▶️ पत्रे या माध्यमाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आर्थिक तुट सोसायची संस्थेची तयारी आहे काय?
▶️ लिखित संवादात

आपल्या संस्थेला मिळालेले यश थोडे यात पण स्पष्टपणे मांडता येण हे देखील अशा प्रकारच्या संवादात महत्वाच असत. आपलं यश हे.
▶️ मोजता येण्याजोग आणि तपासता येण्याजोग असाव.
▶️ संस्थेच्या मुकुटात मानाचा तुरा खोदणारे असावे.
▶️ संस्थेच्या प्रमुख उपक्रमांपैकी किमान एक उपक्रमासंदर्भात असाव.
▶️ लोकांच्या आयुष्यात किंवा त्याच्या भोवतालच्या परिसरात आपल्या कामामुळे काय बद्दल झाला ते सांगणार असाव.
▶️ प्रभावी संवादकर्ता व यशस्वी निधीसंकलन होण्यासाठी

एखाद्या संस्थेस मदत करताना दात्यांचा दृष्टीकोन काय असतो?
▶️ संस्थेचा प्रकल्प हा दात्या संस्थेच्या क्रमवारी व मार्गदर्शक तत्वांशी मिळताजुळता आहे का?
▶️ मदत ही खरोखरच धर्मादाय संस्थेस आहे का व कर सवलतीचा फायदा दात्यास मिळतोय काय?
▶️ संस्थेचे व्यवस्थापक : विश्वस्त मंडळी बाबतचे मत, कर्मचारीवृंदाची पात्रता, क्षमता
▶️ आर्थिक स्थैर्याचा विचार संस्थेने केलाय का?
▶️ प्रकल्पाचा गाभा व प्रकल्पात नमूद केलेली वस्तुस्थिती मदतीसाठी योग्य आहे का? प्रकल्प
कार्यक्षेत्रातील गरजांची/ अडचणीचे संस्थेला संपूर्ण माहिती आहे का? संस्थेचे इतर संस्थांशी असलेले संपर्क लाभार्थींना प्रकल्पातून होणारी मदत दूरगामी आहे का?
▶️ मूल्यांकनाचे घटक योग्य आहेत का?
▶️ प्रकल्पाचा कालावधी, ध्येय, उद्दिष्ट एकमेकांशी संलग्न व सुसंगत आहेत का?
▶️ प्रकल्पाचे ताळेपत्रक, प्रकल्पात नमूद केलेल्या ठोस घटकांशी सुसंगत आहे का?
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular