Homeवैशिष्ट्येभाग ४१- Donar Data Base का व कसा वापरावा ?

भाग ४१- Donar Data Base का व कसा वापरावा ?

भाग ४१
Donar Data Base का व कसा वापरावा?

Donar Data Base म्हणजे विविध प्रकारातील निधीदात्या संस्था, व्यक्तीच्या माहितीचे केलेले योग्य संकलन होय.
डेटा बेसमध्ये व्यक्ती/ संस्थेचे नाव, संपर्काचा पूर्ण तपशील व इतर माहिती उदा. काही तपशील, वाढदिवस, स्मृतिदिन, आधी केलेल्या मदतीचा तपशील, स्थापना, दिनांक वगैरे

तसेच हा का वापरायचा ?
▶️ निधीदात्या व्यक्ती संस्थांची अद्यावत माहिती मिळते.
▶️ त्याच त्याच लोकांशी संपर्क केला जात नाही.
▶️ शक्य तितकी वैयक्तिक माहिती मिळू शकते.
▶️ निधी संकलनातील क्षमता वाढते. देणाऱ्याची क्षमता तर कळतेच पण त्यांचा नियोजनपूर्ण पाठपुरावा करण्याची आपलीही क्षमता वाढते.

Data Base चे निधीसंकलनातील गरज व महत्व :
▶️ अतिशय कमी खर्चात पण तरीही वापरता येण्याजोगी अद्यावत माहितीचे संकलन क्षमता असणाऱ्या निधीदात्यांचे संकलन
▶️ योग्य व्यक्तीशी योग्य वेळी केलेला योग्य संवाद HIT THE Right Message To The right Person at the right time.

Data base व संस्थेच्या विविध गरजांचा ताळमेळ/ समन्वय कसा साधायचा ?
▶️ ज्या कारणासाठी/ उपक्रमांसाठी निधीची गरज आहे त्याची यादी/ जंत्री करा.
▶️ त्यातून अतिशय तातडीच्या, महत्वाच्या, थांबता येणाऱ्या गरजांचे वर्गीकरण करा.
▶️ संस्थेच्या २/३ वर्षे चालणारे उपक्रम व त्यांच्या अनुषंगाने तातडीचे, महत्वाचे ह्याची सांगड घाला.
▶️ प्रत्येक उपक्रमाचा बदलता कालावधीही गरजांचे वर्गीकरण करताना ध्यानात घ्या.

Data Base समजून कसा घ्यायचा ?
▶️ स्वतःला विचारा
▶️ एखाद्याला विचारा
▶️ निधीदात्या संस्थेशीही संवाद साधा.

आपले निधीसंकलनाचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी हे असणे आवश्यक/ हिताचे (Systems Indicators Codes-Database)
▶️ माहिती संकलनाची काही यंत्रणा
▶️ संकलन केलेल्या माहितीसाठी काही निकष
▶️ संकलन केलेल्या माहितीचे वर्गीकरण
▶️ माहिती संकलन

व्यवस्थापनातील चतू:सूत्री
१. नियोजन- Planning
२. आयोजन- Organizing
३. मनुष्यबळ- Staffing
४. नियंत्रण- Controlling
Collect all you need – शक्य तितकी संकलन माहिती गोळा करा.
Use all you have – मुक्तहस्ताने सर्वाचा उपयोग करा.

संवाद कोणाशी साधा ?
▶️ आपण ठरवलेला समूह व कशासाठी कोण मदत घेऊ शकेल ह्याचे पूर्व तयारी
▶️ देणाऱ्याची पार्श्वभूमी देणगीचा इतिहास
▶️ निधीदात्या संस्थेत विषयाशी निगडीत व्यक्तींशीच संपर्क साधा.
निधीसंकलनाचे विविध स्त्रोत
▶️ १०.निधीसंकलनाचे विविध स्त्रोत

येथून निधी मिळू शकेल. :
▶️वैयक्तिक देणगीदार
▶️राज्य किंवा केंद्र शासनाची विविध ▶️योजना
▶️परकीय निधी संस्था/ फौंडेशन्स
▶️राष्ट्रीयकृत बँका
▶️विश्वस्त न्यास
▶️Public Charitable Trusts
▶️Family Trusts- कौटूबिक न्यास
▶️काॅर्पोरेट्रस कंपन्या
▶️वस्तुरूपात मदत
▶️संस्थेच्या उत्पादनाची विक्री करून होणारी मिळकत
▶️परदेशातील भारतीय नागरिकांकडून मदत
▶️Religious Trusts- धार्मिक न्यास

राज्य व केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान :
सामाजिक कामांसाठी राज्य व केंद्र शासनाने विविध विभागामार्फत विविध योजना कार्यान्वित असतात. ज्याची माहिती वृत्तपत्रातून आणि हल्ली वेबसाइटवरून उपलब्ध करून दिली जाते. शासनाच्या पंचवार्षिक योजनेनुसार ज्या सामाजिक प्रश्नांना विशेष प्राधान्य दिल जात त्या प्रश्नांवर स्वयंसेवी संस्थामार्फत काम करण्याच्या दृष्टीने विविध योजनांतर्गत संस्थांकडून प्रस्ताव मागवले जातात. त्यात सहभागी होण्यासाठी काही निकषांची पूर्तता करावी लागते. उदा. ३ वर्षांपूर्वीची नोंदणी, त्या प्रश्नांवरच्या कामांचा अनुभव, ३ वर्षाचे ऑडीट रिपोर्टस इत्यादी, प्रकल्पाचा भाग म्हणून कधीकधी प्रकल्प क्षेत्रात Baseline Survery देखील करावा लागतो.
शासनाने अनुदान प्राप्त झाल्यानंतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता, वेळेवर रिपोर्ट, खर्चाचा लेखाजोखा या ही महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वयंसेवी संस्थेवर असतात.
ह्या अनुदानाचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी संस्थेने त्याबाबतची माहिती सतत गोळा करत रहायला हवं. या निधींचा उपयोग करून काम उभं करताना निधीसंकलनाच्या इतर स्त्रोतांकडे मात्र दुर्लक्ष होता कामा नये.

Other Sources :
काही कौटूबिक, सार्वजनिक न्यास व धार्मिक न्यास हि विविध समाजोपयोगी कामांना मदत करतात. सरदोराबजी टाटा ट्रस्ट, जमनलाल बजाज ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, मुंबादेवी ट्रस्ट, महालक्ष्मी ट्रस्ट हि ह्यातलीच काही नावे.

वस्तू उत्पादन व विक्री :
काही संस्था आपल्या लक्ष्यगटांच्या अनुषंगाने काही वस्तूंची उत्पादन व विक्रीतून निधीसंकलन करतात. उदा. विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तू, माहिती बचत गटांनी केलेल्या वस्तू वगैरे वगैरे

निधीसंकलन करणाऱ्यांसाठी काही खास टिप्स :
▶️ लोकांमध्ये देण्याची मानसिकता निर्माण करायला हवी.
▶️ निधी संकलन ही सतत करायची प्रक्रिया आहे मध्ये थांबून चालणार नाही.
▶️ लांबलचक पत्र किंवा आवाहन वाचायला कुणालाच आवडत नाही. आपलं म्हणण थोडे यात मांडायला हवं.
▶️ आर्थिक गोष्टीपेक्षा संस्थेचे काम आणि गरज यावर भर द्या.
▶️ निधीसंकलन करणाऱ्या टीमला त्या सामाजिक प्रश्नाबाबत आस्था हवी.
▶️ संस्थेची Vision, Mission स्पष्टपणे द्या.
लवचिकता हवी पण मूल्यांशी फारकत होता कामा नये.
▶️ आपलं आवाहन वास्तवाला धरून हवं. आपण सर्व प्रश्न सोडवू शकणार नाही त्यामुळे ज्या प्रश्नावर आपण काम करणार आहोत त्याबद्दल सत्यता देणगीदाराला हवी.
▶️ सतत संशोधन वृत्ती, विचार करण्याची वृत्ती.
▶️ दात्यांचा संस्थेच्या उपक्रमातील सहभाग व प्रशिक्षण

(Don’ts in Fund Raising) देणगीदारांसोबतचं नात जपताना हे लक्षात ठेवा.
▶️ संस्थेची कोणती माहिती पोहोचवायची त्याची खात्री नसण.
▶️ दिलेल्या शब्द न पाळण किंवा विसरण उदा. “आम्ही तुम्हाला फोन करू, पत्र पाठवू” इ.
▶️ जी माहिती पाठवायची त्यासोबत पत्र न पाठवणं.
▶️ माहिती पाठवल्यावर त्याचा पाठपुरावा न करणं.
▶️ देणगीदाराला अपेक्षित माहिती किंवा त्यांच्याशी संबधित माहिती न पाठवणं.
▶️ आभाराची पत्र किंवा मिळालेल्या देणगीची पोचपावती वेळच्यावेळी न देणं.
▶️ देणगीदाराचं नाव चुकीचे लिहिणे.
▶️ देणगी मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कात न राहणं.
▶️ ज्या प्रकल्पासाठी त्यांनी देणगी दिलीये त्याचा रिपोर्ट वेळच्यावेळी न पाठविणं.
▶️ देणगीदारांना आपल्याशी संपर्क साधायचा असल्यास आपण उपलब्ध न होणे.
▶️ आपल म्हणण थोडक्यात मांडा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular