भाग ४२
प्रकल्प लेखन व प्रकल्प नियोजनातील महत्वाचे तत्वे
प्रकल्प लेखन पूर्व तयारी
प्रकल्प-व्याख्या व प्रकल्प-अनुदान परस्पर भूमिका
प्रकल्प पूर्ण नियोजन परस्परांतर्गत भूमिका
विविध प्रकारच्या प्रकल्प लेखनासाठी आवश्यक मुद्दे उदा. निश्चित स्वरूपाच्या प्रकल्पासाठी, बांधकामांसाठी काही सूचना.
निधीदात्या संस्था व दानशूर व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करण्याविषयी मार्गदर्शन महत्वाच्या दस्ताऐवजांचे संकलन व पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तयारी.
प्रकल्प प्रस्तावातून यशस्वी निधी संकलन
शंकानिरसन
प्रकल्प लेखनातील महत्वाचे मुद्दे :
प्रकल्प प्रस्ताव तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रकल्प क्षेत्रातील विविध सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कामकाजाबद्दल आलेली पारदर्शकता व संस्थेची ओळख दुसऱ्या संस्थेला करून देणे. संस्थेचे नाव
संस्थेचा पूर्ण इतिहास
संस्थेने आज पर्यंत केलेले काम व हाती घेतलेले महत्वाचे उपक्रम
संस्थेचे इतर संस्थांशी असलेले संबंध
संस्थेतील कर्मचाऱ्याबद्दल माहिती
संस्थेला इतरांकडून मिळत असलेल्या मदती बाबत उल्लेख
इतर काही विशेष उल्लेख करावयाच्या बाबी.
प्रकल्पलेखन करत असताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी : प्रकल्प लिहिण्यामागील मुख्य कारण
नियोजित प्रकल्पामुळे, कार्यक्षेत्रात होणारे/ होऊ शकणारे विशेष उल्लेखनीय बदल
प्रकल्प प्रस्ताव हा संस्थेच्या ध्येय उदिष्टांशी सुसंगत असावा.
प्रकल्प कार्यक्षेत्रात असणाऱ्या अडचणीबद्दलचा ठोस पुरावा.
प्रकल्प कार्यक्षेत्रात सुधारित बदल घडवून न आणल्यास होणारे परिणाम
प्रकल्प कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजातील इतर घटकांचा समावेश.
प्रकल्प लेखन म्हणजे संस्थेने निवडलेल्या कार्यक्षेत्रातील समाजातील विविध घटकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संस्थेने नियोजन केलेल्या कामाचा प्रकल्प प्रस्ताव तयार करणे अपेक्षित.
ध्येय व उदिष्टे ह्यातील मुलभूत फरक : ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेला बराच कालावधी लागतो.
संस्थेची ध्येय धोरणे हि संस्थेच्या अंतिम ध्येयाशी संबधीत असतात.
उदिष्टे हि ध्येयातून निर्माण होतात व संस्थेने केलेल्या कार्याचे परीक्षण करण्यासाठी महत्वाची असतात.
संस्थेची उद्दिष्टे : संस्थेच्या उदिष्टांवरून संस्थेने केलेल्या कार्याचे मुल्यांकन करता येते.
उद्दिष्टे हि संस्थेचे कार्यक्षेत्र व लाभार्थी निश्चित करतात.
संस्थेच्या उद्दिष्टांवरून प्रत्येक प्रकल्पास लागणारा कालावधी निश्चित करता येतो.
प्रत्येक संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये खालील तीन गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. संस्थेने राबविलेल्या प्रकल्प पुर्तीमुळे मदत होणाऱ्या लाभार्थीची अंदाज संस्था.
संस्थेच्या प्रकल्पामुळे कार्यक्षेत्रात होणाऱ्या बदलांची नोंद.
संस्थेच्या प्रकल्पात लाभार्थीचा सहभाग
उदाहरण : डोक्याच्या शस्त्रक्रियेसाठी वैदकीय साधनसामग्री घेतल्यापासून सहा महिन्याच्या आत शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळ अर्ध्या तासाने कमी होईल.
१ एप्रिल २०११ पर्यंत २५ टक्के महिला सभासदांना आरोग्य पत्रिकेचा अंक मिळेल.
उद्दिष्टांचे प्रकार : ध्येयपुर्तीशी संबंधित प्रकल्प प्रस्तावातही अतिशय महत्वाची असतात.
ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक असणारी उद्दिष्टे : कार्यकर्त्यांचे ज्ञान/ कौशल्ये/ वर्तवणूक/स्वभाव इत्यादी.
संस्थेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचे विविध पैलू
संस्थेचे कामकाज
ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक उद्दिष्टे हि मर्यादित कालावधीसाठी असतात. प्रकल्पाच्या उर्वरित कालावधीसाठी उदा. रोज व्यायामशाळेत जाणाऱ्या रहिवाशापैकी किती रहिवाशी रोज व्यायामशाळेत जाने सुरु ठेवतील.
दूरगामी : ध्येयपुर्तीकडे वाटचाल होताना अपेक्षित परिणाम दिसण्यास वेग लागतो व त्यासाठी सततचा पाठपुरावा करावा लागतो. उदा. आधीच्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी व्यायामशाळेत प्रवेश घेणाऱ्या रहिवाशांच्या संख्येत २० टक्के कपात होईल.
ध्येयपूर्तीच्या वाटचालीत असणारी उद्दिष्टे (वैदकीय)
काही अंतिम ध्येयपूर्तीच्या दृष्टीने काही विशिष्ट उपक्रम हाती घेणे आवश्यक/बंधनकारक
अंतिम ध्येय्पुर्तीशी संलग्न उदा. १ एप्रिल २०११ पर्यंत आरोग्य पत्रिकेचे काम पूर्ण होईल.
धुम्रपान मोहिमेच्या सहा महिन्यांच्या अंमलबजावणी नंतर परिणाम चाचपणी घेण्यात येईल.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मुख्यसंपादक