भाग ४६
निधी संकलन एक आव्हान
निधी संकलन हा सामाजिक संस्थांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. संस्थेचे काम करण्यासाठी कार्यकर्ते जितके महत्वाचे तितकाच महत्वाचा पैसा. संस्थेसाठी निधी उभा करताना संस्था नोंदणीकृत आवश्यक आहे. आयकरामध्ये सुट मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करावे.
संस्थेसाठी पैसा उभा करायचा कोणी ! खूप मोठ्या संस्थांना स्वतंत्र निधी संकलन करणारे युनिट असते. पण प्रत्येक संस्थेला ते शक्य नसते.
मी जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेची कार्यकर्ती आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर असं म्हणतात की, जो काम करतो तो कार्यकर्ता. ज्याला कामाबद्दल आस्था आहे. ज्या समाज घटकांमध्ये आपण काम करतो त्या घटकाला त्यांनी स्वीकारले आहे तो कार्यकर्ता. जो असा कार्यकर्ता असतो तो प्रत्येक जन त्याच्या कुवतीनुसार निधी जमा करू शकतो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पटते ती आता पर्यंत रुजते. ती आपण दुसऱ्याला पटवून देऊ शकतो व कारण पटले की समोरचा माणूस मदत देतो. आता किती रक्कम देईल ते त्या देणगीदाराच्या सर्व प्रकारच्या कुवतीवर अवलंबून असते. पण खरोखरच निधी संकलन वाटते तितके अवघड नाही. ते प्रत्येकाला जमू शकते.
आपण म्हणतो कि देणगी मागायला जमत नाही पण आपण भिक नाही मागत, स्वत:साठी काही नाही मागत, चांगल्या विधायक कामांसाठी मागतो मग लाजायचे कशाला ? कमीपणा वाटायचे कारण नाही.
देणगी मागतांना लाचारी आणायची गरज नाही. देणारा मोठा घेणारा छोटा असे नसते. दोघेही समान पातळीवर असतात. लोक पैसा देणगी जमा करणाऱ्याला नाही संस्थेला देत असतात.
निधी संकलन करणाऱ्या माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्यवहारात संपूर्ण पारदर्शकता पाहिजे. संस्थेत आलेल्या प्रत्येक देणगीची नोंद केली पाहिजे.त्याची पावती दिली पाहिजे. नियमित प्रत्येक वर्षी ऑडीट केले पाहिजे.ासर्व लोकांना हिशोब तपासायला परवानगी दिली पाहिजे.
प्रत्येक देणगीदारशी संस्थेशी परिचित झालेल्या प्रत्येक माणसाशी नियमित संपर्क पाहिजे संस्थेची प्रगती त्यांना कळविली पाहिजे.
देणगी रोख, चेक किंवा वस्तू रूपाने स्वीकारता येते, व्यक्ती, संस्था, फंडिंग एजन्सी यांच्याकडून देणगी घेता येते. आपल्याला नेमके काय काम करायचे, काय हवे हे स्पष्ट पाहिजे.
आपल्याला अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक आहे. कोणत्या कामांसाठी वर्षाला किती खर्च येईल हे स्पष्ट पाहिजे म्हणजे देणगी उभी करणे सोपे जाते. देणगी कोणाकडून घ्यायची हे पण स्पष्ट हवे. समाजाच्या विरोधात काम करणारे लोक दारू, गुटखा यांचे व्यापारी यांनी कितीही देणगी दिली तरी घ्यायची कि नाही याचा विचार करायला हवा. तत्वांशी तडजोड करून कोणतीही देणगी घेऊ नये.
प्रत- पैशासाठी का हेही स्पष्ट हवे. पैसा मिळतोय म्हणून ज्या कामाबद्दल आपल्याला काहीच माहित नाही ते काम स्वीकारू नये.
कधी कधी देणगी नको असेही म्हणता आले पाहिजे आपल्याला त्या देणगीचा उपयोग नसेल तर आम्हाला ती नको आहे हे सांगता आले पाहिजे. काही जाचक अटी असतील तर पैसा हि नको हे सांगता आले पाहिजे. पत्र व्यवहार नेहमी चेकने करावेत. देणगीही शक्यतो चेकने घ्यावी. संस्थेच्या नावावर घ्यावी. खात्याचे व्यवहार दोन किंवा तीन पदाधीकाऱ्यांच्या सहीने असावेत. देणगीचा येणारा प्रत्येक पैसा बँकेत भरावा. सामाजिक संस्था साधारण कशा प्रकारे मदत स्वीकारू शकतात त्याची यादी खालील प्रमाणे देता येईल.
▶️ आर्थिक मदत
▶️ वस्तुरूप देणगी
▶️ जुने पण चांगल्या स्थितीत कपडे, खेळणी, गोष्टीची पुस्तके
▶️वाॅटर बग ,स्टेशनरी,सुती साड्या, बेडशीटस्
▶️ सुस्थितीतील इलेक्ट्राॅनिक उत्पादने, नवीन, पुस्तके, वह्या
▶️ शाळेसाठी लागणारा युनिफॉर्म
▶️ घरात शिल्लक असलेली औषधे ( अंतिम मुदत न संपलेली )
▶️ कोरडा शिधा, धान्य
▶️ वस्तुरूप देणगी देताना जड वस्तू स्वत: संस्थेकडे पोहचवणे इष्ट
▶️ वाढदिवस समारंभाच्या निमित्ताने मिष्टान्नासाठी लागणारा खर्च संस्थेच्या व इतर गरजेसाठी खर्च करणे.
▶️ मुलांसाठी सहल, मेळाव्याचे आयोजन ( सुट्टी बघून अथवा सुट्टीच्या दिवसात )
▶️ वस्तुरूप देणगी संस्था चालकांशी चर्चा करून दिल्यास फायदा होतो.
▶️ संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मासिक / वार्षिक खर्चाची तरतुद ( आर्थिक स्वरुपात ) सामाजिक संस्थाना मदत करताना कृपया हे देण्याचे टाळा.
▶️ घर आवरताना, बदलताना आपल्याला नको असलेल्या वस्तू
▶️ आरोग्याचा विचार करता अंर्तवस्त्रे कितीही चांगली असली तरी ती देणे.
▶️ विजोड, विटलेले कपडे देणे
▶️ आवश्यकता नसलेल्या वस्तुरूप देणग्या
▶️ शिजवलेले व उरलेले अन्न देणे
▶️ खराब झालेली / नासलेली / अधिक पिकलेली फळे देणे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक