HomeUncategorizedभादवण ग्रामस्थांचा कल कोणाकडे ...

भादवण ग्रामस्थांचा कल कोणाकडे …

अमित गुरव ( भादवण ) -: भादवण गावची निवडणूक म्हणजे तालुक्यातील चर्चेचा विषय. त्यामुळे गाव नेहमी केंद्रस्थानी ठेवून नेते धोरणे आखतात. अश्यातच लोकसभेत भादवण कोणाला साथ देणार हा प्रश्न पडणे स्वाभाविक .
काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना उभाटा गट , तसेच इतर गट-तट , मंडळे यांनी हाताचा प्रचार आणि प्रसार दणक्यात केला तर शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) , आणि भाजप यांनी धनुष्यबाण घरा – घरात पोहचवण्यासाठी अतोनात कष्ट केले . २९०१ मतदारांनपैकी १७९५
( ६१.८७ % ) मतदान झाले.
फुटलेले खासदार हा शिक्का बसल्याने , किंवा वरिष्ठ नेत्यावरील लोकांच्या नाराजी मुळे कार्यकर्त्या मद्ये पूर्वी प्रमाणे तो उत्साह जाणवला नाही. त्यात विरोधक महागाई , हुकूमशाही , नुसता आभास यावर इतके बोलून मनपरिवर्तन करीत होते. की छत्रपती शाहू यांना संजय मंडलिक यांच्या पेक्षा अधिक मताधक्य मिळेल अशी चर्चा आहे. भादवण पंचक्रोशी मद्ये छत्रपती शाहू हेच सरस होतील असे ग्राउंड रिपोर्ट सांगतो.
छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या कोपऱ्या – कोपऱ्यातील धावत्या भेटीमुळे त्यांच्या पथ्यावर पडले .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular