Homeवैशिष्ट्येभाग ५१ लेखापरीक्षण (Fund Auditing)

भाग ५१ लेखापरीक्षण (Fund Auditing)

भाग ५१
लेखापरीक्षण (Fund Auditing)

संस्थेचे लेखापरीक्षण योग्य वेळेत पूर्ण झाल्यास, संस्थेची समाजातील विश्वासाहर्ता वाढते व कार्यकर्त्यांपुढेही योग्य आदर्श रहातो.
१) लेखापरीक्षकाची नेमणूक व त्याचे मानधन याचा योग्य तो प्रस्ताव तयार करून तो वार्षिक सर्वसाधारण सभेत पारित करावा.
२) त्यानंतर लेखापरीक्षकला त्याच्या नेमणुकीचे पत्र देऊन आपल्या प्रतीवर ते मिळाल्याची त्यांची सही घ्यावी.
३) लिहिलेले हिशोब बिनचूक होण्यास लेखापरीक्षणाची मदत होते. छोट्या छोट्या चुका दुरुस्त होतात.
४) लेखापरीक्षणाचे वेळापत्रक ठरवून दोघांनी ते काम वेळेत पूर्ण होईल ते पहावे.
५) लेखा परीक्षणातून नोंदवलेली निरीक्षणे, केलेल्या सूचना याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे (Audit Compliances)
६) Auditor शी वाद घालू नये. काही विषयावर दुमत होत असल्यास चर्चा करून, वरिष्ठ, जेष्ठ ऑडीटरच्या सल्ल्याने मार्ग काढावा.
७) केव्हातरी वर्षभरात ऑडीटरने संस्थेला भेट द्यावी, सुरु असलेले काम पहावे, त्याची संस्थेने योजना करावी.
८) लेखा परीक्षण पूर्ण झाल्यावर Balance Sheet, Income & Expenditure Statement समजावून घ्यावे व पूर्ण वाचावे.
९) लेखा परीक्षण ४ प्रति आपल्याकडे ठेवून, १ परत ऑडीटरला द्यावी.
१०) लेखा परीक्षण झाल्यावर, ऑडीटरचे मानधन लगेच देण्याची व्यवस्था करावी.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular