Homeबिझनेसभाग ६५- काही महत्वाची वृतपत्र कात्रणे (Paper Clipping)

भाग ६५- काही महत्वाची वृतपत्र कात्रणे (Paper Clipping)

संस्थेचा व स्वतःच्या कामातील समन्वय
(संस्थेने नमूद करून दिलेले काम झाल्यावर संस्थेतील अधिकारी वर्ग सहकारी कर्मचार्यांना मदत करण्यास किंवा मार्गदर्शक करण्यास कर्मचाऱ्यांना का सांगतो.सुचवितो किंवा काही वेळा सक्तीचे करतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. असे करण्यामध्ये कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा उद्देश अजिबात नसतो. संस्थेतील काही जुने पण अकार्यक्षम सहकारी किंवा नवीन कर्मचारी संस्थेमधील एखाद्या अनुभवी व कुशल कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करू शकतात. ज्या वेळी एखादे नवीन करायचे असते. त्या वेळी विशेषतः असे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे व उपयुक्त ठरते.)
औध्योगिक, शैक्षणिक, सरकारी, खाजगी क्षेत्रातील कोणतीही संस्था एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा विशिष्ट कामासाठी निवडते. तेव्हा संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निवडतो तेव्हा तो स्वतःची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अशी निवड करतो. संस्थेची उद्दिष्टे आणि वैयक्तिक उद्दिष्टे ज्यावेळी सारखीच असतात त्यावेळी चांगले काम होऊ शकते; परंतु व्यवहारामध्ये अशी आदर्श परिस्थती नेहमीच आढळून येत नाही. याचा परिणाम काम चांगले न होण्यावर किंवा निकृष्ट दर्जाचे होण्यावर होतो. असे प्रसंग टाळण्यासाठी काय केले पाहिजे. याचा बारकाईने विचार होणे महत्वाचे वाटते.
असा विचार करताना प्रामुख्याने व्यवस्थापन क्षेत्रातील दोन तज्ञ व्यक्तींच्या कार्याचा किंवा योगदानाचा आढावा घेणे गरजेचे आहे. यातील पहिली आंतराष्ट्रीय ख्यातीची सन्माननीय व्यक्ती हेन्री फेयाॅल, ज्यांनी इ.स.१९१६ मध्ये व्यवस्थापनाकरिता आवश्यक असणारी तत्वे सांगितली. दुसरी व्यक्ती म्हणजे पीटर ड्रकर, ज्यांनी उद्दिष्टांच्या व्यवस्थापनाकरिता सिद्धान्त इ.स १९५४ मध्ये मांडला.
ज्ञान प्रत्येक दिवसाला जुने होत जाते, असे म्हणतात. यात तथ्य आहे. कारण प्रत्येक दिवशी नवीन नवीन ज्ञानाची भर प्रत्येक क्षेत्रात होत असते. या पार्श्वभूमीवर ९४ वर्षापूर्वी किंवा ५६ वर्षापूर्वी सांगितलेले व्यवस्थापन तत्वज्ञान आज कितपत लागू आहे ? तसेच, त्याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे का? वास्तविक पाहता ज्ञान हे सतत ताजे असते. तथापि ते वापरण्याची अंगे बदलत जातात. व्यवस्थापन तत्वाच्या बाबतीत हेच लागू आहे. या जेष्ठ व्यक्तींनी सांगितलेली तत्वे जुनी झाली, असे मानले तरीही ती सद्द परिस्थितीत तंतोतंत लागू आहेत.
ज्यावेळी वैयक्तिक उद्दिष्टांचा संस्थेच्या उद्दिष्ट्यांबरोबर संघर्ष होतो. त्या वेळी संस्थेच्या उद्दिष्टांना प्राधान्य देणे हे कर्मचाऱ्याचे आणि प्रोत्साहन देणे हे व्यवस्थापनाचे काम असते, असे हेन्री फेयाॅल यांनी एका तत्वात सांगितले आहे, हे निश्चितच तर्कशास्त्रावर आधारित आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीपेक्षा संस्था हि नक्कीच महत्वाची असते.
याउलट पीटर ड्रकर यांनी व्यवस्थापक आणि संबंधित विभागातील कर्मचारी यांनी एकत्रपणे सल्लामसलत करून उद्दिष्टे ठरवावीत, असे सांगितले आहे. हेन्री फेयाॅल यांचे तत्व अनुसरले तर कदाचित एखादा कर्मचाऱ्याला संस्थेनी त्याच्यावर उद्दिष्टे लादलेली आहेत, असे वाटणार नाही, अर्थात, त्यासाठी कर्मचाऱ्याला व्यवस्थापनास कोणती उद्दिष्टे अधिक महत्वाची, दूरगामी आणि संस्थेच्या हिताची आहेत, हे व्यवस्थित पटवून द्यावे लागेल.
निरनिराळ्या संस्थामध्ये कर्मचारी स्वतःचे संस्थेचे आवश्यक तेवढे काम लवकरात लवकर संपवून स्वतःचे काम करण्यास प्राधान्य देतात. त्याचवेळी व्यवस्थापनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना संस्थेचे, काही वेळा बिन महत्वाचे किंवा अनावश्यक काम देऊन गुंतवून ठेवतात. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांना कामाचा मुबलक अनुभव असतो, त्यांना संस्थेचे उपलब्ध करून दिलेल्या ५० ते ६० टक्के वेळातच ते काम सहजपणे केले जाते. काही वेळा नवीन कर्मचाऱ्यांना वाजवीपेक्षा किंवा उपलब्ध करून दिलेल्या वेळापेक्षा (अनुभवाअभावी) जास्त वेळ लागतो.
कर्मचाऱ्यांना वैयक्तिक काम कार्यालयाच्या वेळात करू द्यायचे अथवा नाही, असा धोरणात्मक निर्णय संस्था करू शकते.संस्थेचे काम झाल्यावर कर्मचारी काय काम करतो. याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तो संस्थेविरुद्ध कारवाया करताना आढळला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येते.
काही संस्था, कर्मचाऱ्यांना त्यांना ठरवून दिलेले संस्थेचे काम झाल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना मदत करण्यास सांगते. विशेषतः नवीन कर्मचाऱ्यांना किंवा अकार्यक्षम कर्मचाऱ्याला असे सांगितले जाते. काही धूर्त कर्मचारी संस्थेच्या कामात अशा प्रकारे नियोजन करतात, की संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या वेळेतच त्यांचे काम संपते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना आपल्या सहकारी बांधवांना मदत करण्यास आवडते, ते विनासायास व्यवस्थापकाकडून आदेश नसतानासुद्धा इतर गरजू कर्मचाऱ्यांना आपणहून मदत करतात. याचा उपयोग संस्थांतर्गत निवडणुका जिंकण्यास फार चांगल्या प्रकारे करून घेता येतो.
संस्थेने नमूद करून दिलेले काम झाल्यावर संस्थेतील अधिकारी वर्ग सहकारी कर्मचाऱ्यांना मदत करण्यास किंवा मार्गदर्शन करण्यास कर्मचाऱ्यांना का सांगतो, सुचवितो किंवा काही वेळा सक्तीचे करतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. असे करण्यामध्ये कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा उद्देश अजिबात नसतो. संस्थेतील काही जुने पण अकार्यक्षम सहकारी किंवा नवीन कर्मचारी संस्थेमधीलच एखाद्या अनुभवी व कुशल कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करू शकतात.
ज्यावेळी एखादे नविनकाम करायचे असते, त्यावेळी विशेषतः असे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे व उपयुक्त ठरते. एखाद्या कामामध्ये तरबेज असलेला कर्मचाऱ्याच्या कामाला हातभार लावत असताना आपोआपच त्याला त्या कामाची माहिती होते. आशा प्रकारे ऑन-जॉब ट्रेनिंग सुद्धा देता येते. जेव्हा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जास्त असते. तेव्हा जास्तीत जास्त कामे करता येणारे कुशल कर्मचारी संस्थेसाठी वरदान ठरतात. तसेच ज्या वेळी एखाद्या विभागावर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यावेळी इतर विभागांतील मोकळ्या कर्मचाऱ्यांनी मदत केल्यास संस्थेचेच काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होते.
वर नमूद केलेल्या दोन्ही जेष्ठ व्यक्तींच्या तत्वांचा अतिरेक न करता, त्यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे, काही कर्मचारी व्यवस्थापनाबरोबर व्यवस्थित बोलणी करण्यात अपयशी ठरतात. असे कर्मचारी कामाची उद्दिष्टे नीट ठरवू शकत नाहीत. अशा कर्मचाऱ्यांपैकी पीटर ड्रकर यांची तत्वे उपयुक्त ठरत नाहीत.
संस्थेच्या हितातच आपले हित आहे, हे कर्मचाऱ्यांना पटवून दिले आणि असे हित असलेल्या गोष्टी जर घडताना कर्मचाऱ्यांना दिसल्या, तर कामाच्या बाबतीत कोणतीही तक्रार उरत नाही ; न व्यवस्थापनाकडून ना कर्मचाऱ्यांकडून !
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular