भादवण -: ( प्रतिनिधी ) – भादवण येथील सौ. भारती विष्णू जोशीलकर ( वय 55 ) यांचा मृतदेह चित्री नदीपात्रात आढळून आला . जोशीलकर 9 तारखेपासून बेपत्ता होत्या . खूप शोधाशोध करून ही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे घडल्या प्रकारची वर्दी विक्रम जोशीलकर यांनी आजरा पोलीस स्टेशन मध्ये दिली. सोमवारी 11 तारखेला त्यांचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना दिसला. त्यांच्या पश्चात पती , मुलगा , 2 मुली आहेत.
मृत्यू चे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही . पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.
संदर्भ- मृत्युंजय महा न्यूज
मुख्यसंपादक