Homeघडामोडीशेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर 5...

शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी, स्वाभिमानी मागणी करणार |

शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख

Sangli News : शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस दहा लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे.

शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख
शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख

Sangli News : सांगली जिल्ह्यासह सर्वत्रच शेतकऱ्यांच्या (Farmers) मुलांच्या लग्नाची (Marriage) अवस्था बिकट आहे. एबीपी माझाने देखील ‘नवरी मिळेना नवऱ्याला’ या विशेष परिषदेच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडली होती. या परिषदेची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatna) आता शेतकरी मुलांच्या लग्नाच्या विषयावरुन लवकरच वरात मोर्चा (Varat Morcha) काढणार आहे. शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस दहा लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न ही एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकरी मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीस दहा लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. शिवाय या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चा काढणार असल्याचे खराडे यांनी म्हटलं आहे.

‘शेतकरी नवरा नको गं बाई’


सध्या ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ हेच सर्वत्र ऐकायला मिळते . शेतकरीही आपली मुलगी शेतकरी मुलाला देण्यास तयार नाहीत. मुलगा शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी नकोच हे तरुण मुलींनीही ठरवून टाकले आहे. या मानसिकतेमुळे प्रत्येक गावात किमान 40 ते 50 मुले बिनलग्नाची आहेत. चाळिशी पार केलेली मुले लग्न कधी होणार या विवंचनेने ग्रासलेली आहेत. त्याचे कुठे कामात लक्ष नसते, त्याच्यात चिडचिडपणा वाढलेला आहे. काहीजण मनोरुग्ण झालेले आहेत.

….म्हणून मुली शेतकरी नवरा करण्यासाठी उत्सुक नाहीत!


याला कारण आहे शेतीमधील बिनभरवशाचे उत्पन्न, शेतीमालाला हमीभाव नाही, कमी व्याजदराने कर्ज पुरवठा नाही, हमखास बाजारपेठ नाही, शासकीय धोरणे शेतकरी हिताची नाहीत. हाडांची काडे आणि रक्ताचे पाणी करुन शेतीमाल पिकवला तरी तो योग्य भावात विकेल याची कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे शेती करणे म्हणजे जुगार खेळणे झाले आहे. जे आपण भोगतोय ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये ही भावना शेतकरी बापाची झाली आहे. बापाचे दारिद्र्य, घर चालवताना बापाची होत असलेली तारांबळ ती बघत असते. त्यामुळे तीही शेतकरी नवरा करण्यासाठी उत्सुक नाही. त्यामुळेच शेती करणाऱ्या मुलाचे विवाह होत नाहीत ही समस्या आर्थिक आणि सामाजिक आहे.

शेतकरी मुलांच्या लग्नाचा विषय आता सामाजिक आणि आर्थिक


शेतीचे अर्थकारण सुधारले तर ही समस्या चुटकीसरशी सुटेल, मात्र त्याला सर्व राजकारणी मंडळींनी मतांवर डोळा न ठेवता शेतीची धोरणे ठरवली पाहिजेत. त्याचबरोबर शेतकरी मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर 10 लाख तर मुलीच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेव ठेवावी. किमान त्यामुळे काही मुली शेतकरी नवरा करायला तयार होतील. तर काही बाप शेतकरी जावई करायला तयार होतील. लग्न हा विषय वैयक्तिक असला तरी तो सामाजिक आणि आर्थिक बनला आहे. त्यामुळेच आम्ही या मागण्यांसह या विषयाकडे समाज आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करणार असल्याचे खराडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख
शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख

शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न केल्यास मुलीला दोन लाख रुपये देणार; जेडीएसच्या जाहीरनाम्यात आश्वासन


दरम्यान शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत किंवा शेतकरी मुलाशी लग्न करण्यास मुली तयार होत नाहीत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली. जेडीएसचं सरकार सत्तेत आल्यास शेतकरी मुलाशी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना दोन लाख रुपये देण्यात येतील, असं कुमारस्वामी यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मुद्दा राज्यात चर्चेला आणला आहे.

अधिक माहिती

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular