अमित गुरव ( भादवण )-: गुरुशिष्य हे अतूट नाते पण गेली 33 वर्षे काही सवंगडी एकमेकांपासून दूर झाले होते. काहींनी आपला व्यवसाय तर काही नोकरी व इतर उद्योगात रममाण झालेले. व्हाट्सअप्प च्या ग्रुप मधून एकत्र आलेले वर्गमित्रमैत्रिणी यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि बेत ठरला. भादवण हायस्कुल भादवण ची ही SSC ची बॅच एकत्र जमण्याचे नियोजन यात्रेच्या कालावधीत केले गेले.
दीपप्रज्वलन व उद्घाटन वी. आर. खोराटे सर यांच्या हस्ते झाल्यानंतर ए. ए. पाटील , खोराटे , टी. ए. पाटील , आयवाळे या सर्व माजी शिक्षकांचा सत्कार केला. शिक्षकांनी आम्हाला कशी मदत आणि प्रेरणा दिली आणि आम्ही आज घडलो असे मत व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी ही आमची ही मुले आज कोणत्याही क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे ही परिपूर्ण बॅच असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.
यावेळी दयानंद शिवगंड , अरुणा यांनी आपल्या आवाजाने सर्वाना मंत्रमुग्ध केले . स्त्रियांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम झाल्यानंतर सर्वाना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील तर आयोजन आर. बी . पाटील सुनील मुळीक , अतुल पाटील , पांडुरंग करूनकर यांनी केले.
मुख्यसंपादक