१) सगळ्यात आधी डोळ्यांचा मेकअप काढावा.
२) डोळ्याच्या पापणीच्या वरच्या बाजूला लावलेला मस्कारा काढण्यासाठी आय क्लींजिंग लोशन कापसाच्या बोळ्यावर घेऊन मस्कारा काढावा.
३) आय लाइनर व आय शॅडो घालवण्यासाठी सुती कपड्यात आय मेकअप रिमूव्हरचा वापर करावा.
४) फेस क्लींजिंग क्रीम हातावर घेऊन नाक, गाल, कपाळ व कानावर लावून मसाज करावा. त्यानंतर मानेवर मसाज करून झाल्यानंतर पेपर नॅपकीनने चेहर्यावर लावलेले क्रिम हलक्या हाताने काढावे.
५) मेकअप काढल्यानंतर परत एकदा कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
६) जेव्हा जेव्हा स्किन क्लींजिंग करायचे असेल तेव्हा तेव्हा टोनिंग व मॉइश्चराइजिंगही करावे. त्वचा कोरडी झाली असेल तर नरीशिंग करायला विसरू नये.
मुख्यसंपादक