Homeघडामोडीमोदींची पेट्रोल दराची सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी…….

मोदींची पेट्रोल दराची सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी…….

कागल (प्रतिनिधी) -:
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत. आजघडीला पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयाच्याही पुढे जाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी शतकवीर ठरले आहेत. त्यांनी मारलेली पेट्रोल दराची ही सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी आहे.

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन झाले.

वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांचे कंबरडेच मोडले आहे. केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेले आहे. पेट्रोलसह डिझेल व गॅसच्या दरवाढीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोरगरिबांना महागाईच्या गर्तेत लोटले आहे.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची देशात मनमानी सुरू आहे. जनतेला ते जुमानत नाहीत. महागाईने हैराण झालेली जनता भविष्यात निश्चितच भाजपला हिसका दाखवेल.

ही तर शेतकऱ्यांची थट्टा…….
हाडं गोठवणार्‍या थंडीतही दिल्लीमध्ये शेतकरी गेल्या 60 ते 65 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. त्यातील 50 ते 60 जणांचा जीव गेले, तरीही मोदीना त्यांची दया येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर त्यांच्याशी संवाद साधायलाही वेळ नाही. उलट शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून त्यांची ते थट्टा करीत आहेत. याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल.

यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, दत्ताजीराव देसाई, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, गंगाराम शेवडे, नवाज मुश्रीफ, सुधाकर कोरवी, इरफान मुजावर, संग्राम लाड, सागर गुरव, पंकज खलीफ, राजू माने, बबनराव सूर्यवंशी, अजित पाटील, बच्चन कांबळे, निशांत जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular