आवताच्या भोकात
खूपसलेल रूम्हण हे नुसते
जमीन वखरण्या साठीच नसून
आपल्या हक्कावर गदा
आणणार्यांच्या टाळक्यात
घालण्यासाठी आहे. अन
त्यासाठीच बळीराजा त्याला
हातात घेईल तेंव्हाच खऱ्या
अर्थाने क्रांतीची सुरवात होईल…
निखरट निष्ठूरांच्या जखमांनी
रक्तभंबाळ झालेला बळीराजा
त्याने त्याच्या अंगावरच्या
जखमा राखून ठेवल्या
आहेत की प्रतीवार करताना
धार यावी म्हणून…
निष्कर्षाआधी आम्हाला
निकषात अडकवनाऱ्यानो
आमचा बळीवंश निशस्त्र
कधीच नव्हता आणी नाहीही….
अवताच्या पासा,नांगराचे फाळ ,
खूरपे,विळे कोयते,
आसूड,दांडगे अन रूम्हण .
तलवारी चालवण्याचा वारसा
आहेच आमचा
शस्त्र म्हणून जेंव्हा हातात
येईल ना तेंव्हा तूम्ही कितीही
सत्तेच्या कवच कूंडलानी
सज्ज असा ,तुमचा असा
कोथळा काढू की पून्हा
कोन्हाचीही हिम्मत नाही
व्हायची बळीराजाच्या हक्कावर
अतिक्रमण आणण्याची…
( वखराला आधार व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेल्या जाणार लाकडी अवजार )
- जगन्नाथ काकडे, ( मेसखेडा , जि.जालना )
मुख्यसंपादक