ओढ मातीची

वळणावळणाचा नागमोडी,माझ्या गावाकडचा रस्ता
दुतर्फा झाडी उंच उंच ,गावाकड चल माझ्या दोस्ता …

हिरवगार सार शिवार ,झुळझुळ वाहते पाणी
गुरे चरती कुरणात ,पक्षी किलबिल गाणी …

माझ्या गावाकडची माणसं,आहे मनाने दिलदार
सुखदुःखात धावती, एकमेकांचा ती आधार ….

गावच्या मातीचा सुगंध, चहू दिशेला दरवळतो
ओढ मातीची मजला,गावाकडे बोलवतो ……

अरे लावीतो भाळी,माझ्या गावाकडची माती
देते लढायला बळ, जपे माणुसकीची नाती ….

थोर उपकार तिचे, किती किती गाऊ महती
पिढ्यानपिढ्या जगविल्या, अशी गावची माती .


कवी – किसन आटोळे सर
वाहिरा ता आष्टी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular