Homeघडामोडीशिवजयंती साजरी केली म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष व उपनगराध्य यांच्यावर गुन्हा

शिवजयंती साजरी केली म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष व उपनगराध्य यांच्यावर गुन्हा

गडहिंग्लज (अमित गुरव ) -: शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यावर शासनाने निर्बंध घातला होता. पण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मध्ये या नियमाला बगल देत शिवभक्तांनी जय्यत तयारी करून शिवजयंती केली. त्यावेळी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा नोंद होणार अशी चर्चा कानावर पडताच मिरवणुकीच्या समोरोपा वेळीच पोलीस व शिवप्रेमी मध्ये वादा-वादीचे प्रकार घडले. पण उपनगराध्यक्ष महेश कोरी आणि पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यात चर्चा होऊन ट्रॅक्टर चालकास सोडण्याचे ठरले तेव्हा ३ तास रास्ता रोको करण्याऱ्या शिवप्रेमींनी त्याचे आंदोलन मागे घेतले.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद केला न्हवता पण कोरोना भंग केल्याप्रकरणी मिळवणुकीत सामील असणाऱ्यांवर गुन्हा नोंद केला. नगराध्यक्ष स्वाती महेश कोरी, उपनगराध्यक्ष महेश बसवराज कोरी, बाळेश बंडू नाईक, बसवराज खणगावे, राजेश बोरगावे, सागर पाटील, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापुरे, विना कापसे, विनोद लाखे, शिवाजी कुराडे, दीपक कुराडे, प्रकाश तेलवेकर, बाळासाहेब भैसकर, इम्रान मुल्ला, श्रद्धा शिंत्रे, शशिकला पाटील, सुनिता पाटील, उदय पाटील , नाज खलीपा, लता पालकर ( राहणार गडहिंग्लज ) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular