Homeघडामोडीश्री मूळपीठ यमाई देवी गुरव पुजारी औंध यांचेमार्फत शासनाकडे कोविड सेंटरसाठी 10...

श्री मूळपीठ यमाई देवी गुरव पुजारी औंध यांचेमार्फत शासनाकडे कोविड सेंटरसाठी 10 बेड सुपूर्त

औंध ( राजेंद्र गुरव ) – covid-19 या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये कोरोणाला सामोरे जाण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत.
सातारा जिल्हा, खटाव तालुक्यातील गंभीर स्थिती पाहता शासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री मूळपीठ यमाईदेवीचे गुरव पुजारी यांनी 10 बेड आज शासनाकडे मा प्रांत साहेब माण खटाव श्री सूर्यवंशी साहेब,
खटाव प्रांत जनार्दन कासार सो
यांचे मार्गदर्शनाखाली, मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी , औंध तलाठी निनाद जाधव, कृषीमंडलाधिकारी अक्षय सावंत यांच्या सहकार्याने.
मा तहसिलदार खटाव किरण जमदाडे यांजकडे सुपूर्द केले .
कोवीडकाळामध्ये समाजोपयोगी अशी अनेक कामे श्री यमाई गुरव पुजारी औंध यांच्यामार्फत करण्यात आलेली आहेत. मे 2020 च्या दरम्यान सुमारे दोन हजार पेक्षा जास्त व्यक्तींना समाजामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. गरजू लोकांना किराणामाल, शिधा देण्यात आला होता. त्याचप्रमाणे कोविड योद्धयांना ड्रायफ्रूट्स ,सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज इत्यादी वस्तू देण्यामध्ये ही समाजाचा सहभाग होता.
हीच परंपरा राखत आज
कोवीड बांधीतांची वाढती संख्या लक्षात घेता व व बेडचा तुटवडा लक्षात घेता ,गुरव समाजाने ही मदत शासनाला केलेली आहे .
या संपूर्ण कार्यात श्री रमेश गुरव, श्री सागर गुरव ,हनुमंत गुरव, तेजस गुरव, अमोल गुरव, संदीप गुरव ,शैलेंद्र गुरव, गणेश गुरव, सचिन पछाडे ,कांता गुरव, प्रसाद गुरव,अवधूत पछाडे, आनंद पछाडे,सोहम गुरव, राजेंद्र गुरव यांच्या एकत्रित प्रयत्नाने, हे काम यशस्वी झाले आहे.
कार्यक्रमास कृषी मंडलाधिकारी श्री सावंत, सौ साठे मॅडम, श्री सादिगले सर उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular