MNDA भाग २
संस्था विश्वस्तांच्या संदर्भातील काही महत्वाची माहिती :-
सामान्यतः विश्वस्त आपल्याकडील अधिकार, कार्य किंवा कर्तव्ये दुसऱ्या व्यक्तीस अथवा सहकारी विश्वस्तास सुपूर्द करू शकत नाहीत. परंतु सामान्यपणे विश्वस्त निवडक अधिकारी, कार्य किंवा कर्तव्ये दुसऱ्या व्यक्तीस सुपूर्द करतात. मात्र ज्यावेळेस एखादा निर्णय विश्वस्तास स्वेच्छेने घ्यायचा असेल तेव्हा तो त्याने स्वतःनेच घ्यायचा असतो.
न्यासाच्या मालमत्तेची कायदेशीर माहिती :-
न्यासाच्या सर्व मालमत्तेची (स्थावर आणि जंगम ) कायदेशीर मालकी विश्वस्तांकडे असते.
मालमत्तेच्या हितसंबंधाविषयीचे वाद विश्वस्त कसे टाळू शकतात.
विश्वस्त न्यासाची मालमत्ता स्वतःसाठी विकत घेऊ शकत नाही अथवा स्वतःची मालमत्ता न्यासाला विकू शकत नाही. सदर नियमात विश्वस्ताच्या कर्तव्य अथवा हितसंबंधाच्या अनुषंगाने कोणतेही बदल झाल्यास वाद उत्पन्न होऊ शकतो.
विश्वस्तांचे निलंबन व बडतर्फी :-
मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियमाच्या कलम ४१ ड अन्यवे धर्मादाय आयुक्त खालील कारणासाठी कोणत्याही विश्वस्तास निलंबित करणे, काढून टाकणे किंवा बडतर्फ करण्यासाठी अधिकार वापरू शकतो.
१) लेखे, प्रतिवृत्त किंवा विवरण सादर करण्यात सतत कसूर केली असल्यास,
२) कोणत्याही विधीसंमत आदेशांची हेतुपूर्वक अवज्ञा केली असल्यास,
३) आपल्या कर्तव्याकडे सतत दुर्लक्ष केले असल्यास किंवा विश्वासघात केल्यास,
४) न्यासाच्या मालमत्तेचा दुर्विनियोग अथवा त्यासंबंधाने अनुचित व्यवहार केला असल्यास,
५) नैतिक अधःपाताचा अंतर्भाव असलेल्या अपराधाबदल दोषी ठरला असल्यास, माहिती संकलन : युवराज येडूरे, अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
🙏🤝🙏😊🙏🤝🙏
मुख्यसंपादक