Homeघडामोडीसरपंचांची साद जनतेचा प्रतिसाद

सरपंचांची साद जनतेचा प्रतिसाद

(आजरा ) -: सरपंच आपल्या दारी या भादवण येथील गुरव गल्लीतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संतोष केसरकर यांनी केले ; त्यावेळी या वार्ड मधील एक ही सदस्य उपस्थित नाहीत त्यामुळे त्यांची जनते सरपंचांची साद जनतेचा प्रतिसाद कार्यक्षमता कमी पडते की काय अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सरपंच आपल्या दारी का येत आहेत कारण तुम्ही आम्हाला निवडून दिले त्याची ही उतराई आहे. ग्रामपंचायत मीटिंग ला काही कारणास्तव काही लोकांना हजर राहता येत नाही म्हणून सरपंचांना असे वाटले आम्हीच नागरिकांच्या दारात जाऊन समस्या जाणून घेऊ. काम हे आमचे कर्तव्य आहे असे मत उपसरपंच दयानंद पाटील यांनी मांडले.
गटर दुरुस्ती , सिमेंटिकरण करून देण्याचे आश्वासन पाळावे हे काम तुम्हीच करू शकता अशी भावना केसरकर यांची होती . पाणी पुरवठा खूप कमी होतो , पाईप लाईन बदलणे , रस्तावरील बल गेला की त्याची ची व्यवस्था लवकर करावी तसेच महिलांच्या समस्या जनधन योजना , PM किसान योजना , आयुष्यमान योजना , उज्ज्वल गॅस योजना , रेशनकार्ड बाबत अश्या जनतेच्या अनेक समस्या जाणून घेतल्या.
तुम्ही १६ सूचना केल्या आहात आता आम्ही त्याचा अभ्यास करून जबाबदाऱ्या पार पाडू असे आश्वासन दिले. पाण्याची समस्या दूर होण्यासाठी आमदार प्रकाश आंबिटकर यांच्या मदतीने पाण्याची टाकी बांधली आहे ही समस्या फेब्रुवारी प्रयत्न पूर्ण होईल असे सरपंच संजय पाटील म्हणाले. तसेच जर घरचा परिसर स्वच्छ केला तर ठीक नाहीतर भविष्यात हे काम ग्रामपंचायत करेल पण त्यासाठी तुम्हाला जादा कर द्यावा लागेल. असा सज्जड दम ही ग्रामस्थांना आपल्या शैलीत दिला. जे लोक अज्ञानी पणे माहिती न घेता आमच्यावर टीका करतात पेपरमध्ये वाटेल ते छापून आमची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात त्यांनी ज्ञानी व्हावे , असा सल्ला कोणाचे नाव न घेता भादवण ग्रामपंचायतीवर भष्ट्राचाराचा आरोप करणार्यांना दिला.
आभार व्यक्त न करता ज्यावेळी आपल्याकडून या १६ कामांची वचनपूर्ती होईल त्यावेळी आम्ही अश्याच एका कार्यक्रमात सत्कार करू असे अमित गुरव बोलले. गुरव गल्ली मार्फत पुस्तक देऊन त्यांनी धन्यवाद देत कार्यक्रमाची सांगता केली.
बाळू कुंभार , प्रमोद घाडगे , विजय शिंदे , अनिकेत पाटील , प्रकाश शिंदे , अनिल गुरव , दिनकर गोडसे , जितू गाडे , निवृत्ती पाटील, तसेच भादवण ग्रामस्थ उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular